चाळीसगाव (प्रतिनिधी) – बिलाखेडा परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत तरुणाचे नाव शंकर राजेंद्र कोळी (वय २५, रा. बिलाखेडा, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे आहे. त्याने अज्ञात कारणातून विष प्राशन केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी अ.मृ. क्रमांक ५३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १९४ अंतर्गत नोंद करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.








