आरोपीला अटक ; भुसावळ तालुक्यातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भुसावळ शहरामध्ये एका गावातील रहिवासी साडेतीन वर्षीय मुलीवर शाळेच्या व्हॅन चालकाने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला नवीन भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार विनयभंग व पोकसो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.
भुसावळ शहरामध्ये एका गावात सुशिक्षित परिवार राहतो. या परिवारामध्ये साडेतीन वर्षीय मुलगी ही एका शाळेत नर्सरीच्या वर्गात शिकत आहे.(केसीएन)तिला शाळेत सोडून देणे, वाढणे यासाठी स्वतंत्र व्हॅन लावण्यात आली आहे. या व्हॅनवर प्रसाद हिरासिंग चौधरी (वय २५, रा. साकरी ता. भुसावळ) हा चालक आहे.
सदरहू मुलगी ही सोमवार दि. १ जुलै व मंगळवार दि. २ जुलै रोजी शाळेत जात असताना व्हॅन चालक संशयित प्रसाद हिरासिंग चौधरी यांनी सदर साडेतीन वर्षीय मुलीच्या गुप्तांगाची छेडछाड करून दुखापत करीत विनयभंग केला.(केसीएन)सदरहू प्रकार हा बालिकेने गुरुवारी आईला सांगितल्यानंतर उघडकीस आला आहे.
या प्रकरणी बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला विनयभंग व पोक्सो अंतर्गत कलम ६४, ६५(२),२,३,४,५,६ यासह अनुसूचित जाती अत्याचार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे भुसावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.