• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कृषिपंपाना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी एचव्हीडीएस योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करा – ऊर्जामंत्री

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 9, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

मुंबई (प्रतिनिधी ) ;- शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेची कामे जलद गतीने करा व वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज महावितरणला दिले.

उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेचा (एचव्हीडीएस) आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आज एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ राऊत यांनी एचव्हीडीएस योजना राबवितांना गुणवत्तापूर्ण कामे करण्यासाठी कामाचे वेळोवेळी योग्य निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या.

मुख्य अभियंता व अधिक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून प्रलंबित एचव्हीडीएसच्या कामाचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

विशेष घटक योजने अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या अर्जदारांना वीज जोडण्या देण्यासाठी निधी उपलब्ध असून या प्रवर्गातील अर्जदारांना वीज जोडण्या देण्यासाठी तरतूद करण्यात आल्याची माहिती कार्यालयाच्या माहिती पत्रकावर ठळकपणे नमूद करून याला व्यापक प्रसिद्दी देण्याची सूचना त्यांनी यावेळी केली.

कोरोनाच्या काळात ही योजना राबविण्यात अडचणी निर्माण झाल्यात. त्या अडचणी दूर करीत यापुढे ही योजना जलदगतीने राबविण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिलेत.

नागपूर प्रादेशिक विभागात एचव्हीडीएसचे ८३ टक्के काम पूर्ण झाले आहे तर औरंगाबाद प्रादेशिक विभागात ६४ टक्के, कोकण व पुणे प्रादेशिक विभागात प्रत्येकी ७८ टक्के काम पूर्ण झाले आहे, असे या बैठकीत एका सादरीकरणात सांगण्यात आले.

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, मराविमं सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.


 

 

Previous Post

महाराष्ट्र सरकार एसटीला देणार 600 कोटी – परिवहन मंत्री अनिल परब

Next Post

गुरुजींना वाढदिवशी जीवनातील बेरजेचे गिफ्ट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गुरुजींना वाढदिवशी जीवनातील बेरजेचे गिफ्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान
1xbet russia

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026
1xbet russia

May 22, 2026
उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!
1xbet russia

उपनिबंधक जगदीश बारी यांच्या बँक लॉकरमध्ये आढळले १ कोटी ७ लाखांचे सोने व रोख रक्कम!

May 22, 2026
सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी
1xbet russia

सिगारेटच्या पैशांवरून वाद; जळगावात दुकानदाराला चाकूने धमकी

May 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांचा ‘ग्लोबल एचआर लीडर ऑफ द इयर’ने सन्मान

May 22, 2026

May 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon