• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या २६७ विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘छावा’ चित्रपट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2025
in जैन कंपनी, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या २६७ विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘छावा’ चित्रपट

संभाजीराजांच्या शौर्य, पराक्रमामुळे विद्यार्थी भावूक

https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/03/WhatsApp-Video-2025-03-02-at-5.48.23-PM.mp4
https://kesariraj.com/wp-content/uploads/2025/03/WhatsApp-Video-2025-03-02-at-5.48.12-PM.mp4

जळगाव (प्रतिनिधी) : स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र हालअपेष्टा सहन करून स्वराज्यावरील प्रत्येक आक्रमणाला तोडीसतोड उत्तर देणारे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या शुर पराक्रमांची कहाणी ऐकली, बघितली तर आजही प्रेरणा मिळत असते. या प्रेरणेतूनच स्वराज्य रक्षक आदर्श समाज घडावा, यासाठी शाळकरी मुलांना इतिहासातील बारकावे लक्षात यावे या हेतूने जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन यांनी अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छावा’ चित्रपट बघण्याची संधी उपलब्ध करून दिली.

स्टार मल्टिप्लेस या अत्याधुनिक चित्रपट गृहामध्ये ‘छावा’ चित्रपटाची अनुभूतीच्या इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी घेतली. शिक्षक, शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थी असे एकून २६७ जणांनी एकाच वेळी तीन स्क्रीन वर छावा चित्रपट बघितला. यासाठी प्राचार्या रश्मी लाहोटी, जनसंपर्क अधिकारी मनोज दाडकर, रूपाली वाघ यांच्यासह सर्व शिक्षकवृदांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. ‘कुठलाही इतिहास हा शौर्य, पराक्रम, कठिणातून कठिण प्रसंगातही ध्येय कसे साधायचे, आपल्या जवळ जे आहे त्या संसाधनांमध्ये विजयश्री कशी मिळवावी हे शिकवतो. त्याकडे बघण्याची दृष्टी मात्र तशी पाहिजे.’ लेखन, ग्रंथ, गड, किल्ले, बुरुज, मंदिर हे इतिहासात घडलेल्या गोष्टी, घटनांचे आज ही साक्षीदार आहेत. ह्याच इतिहासात गुलामगिरीला झुगारून जनतेच्या प्रती असलेल्या आस्थेमुळे स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजांचे शौर्य अतुलनीय ठरते.

विद्यार्थ्यांना प्रेरणा
‘श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी गरिब मुलांना उच्च प्रतिचे इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे या हेतूने अनुभूती स्कूल सुरू केली. महाराष्ट्रात अनेक वीर योद्धा होऊन गेले त्यांचा खरा इतिहास विद्यार्थ्यांना समजावा यासाठी जेणे करून त्यांना प्रेरणा मिळेल यासाठी विद्यार्थ्यांना चित्रपट दाखविण्यासाठी घेऊन आलो.’
रश्मी लाहोटी, प्राचार्या, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल

‘छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र विद्यार्थ्यांना समजावे त्यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी अनुभूती स्कूलच्या व्यवस्थापनाने ‘छावा’ चित्रपटाची संधी उपलब्ध करुन दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद!’
मनिषा प्रशांत मल्हारा, इतिहास शिक्षिका, अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूल

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
‘छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास हा फक्त पुस्तकातून अभ्यासला होता. मात्र चित्रपटातून दोघंही महापुरूषांचे चरित्र अभ्यासता आले ही आमच्यासाठी खूप मोलाची गोष्ट आहे, असे आठवी वर्गाची हर्षिता म्हणाली. तर ‘शंभूराजांच्या जीवनाविषयी अभ्यास करण्याची संधी चित्रपटातून उपलब्ध करुन दिली त्याबद्दल अनुभूती स्कूलच्या व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करते.’ असे आठव्या वर्गातील साक्षी देशमुख म्हणाली. ‘छावा चित्रपट बघितल्यानंतर शंभुराजांचे चरित्र समजले. कितीही कठिण परिस्थीती आली तर न डगमगता लढत रहावे, तिला सामोरे जावे. त्यासाठी घाबरु नये अशी शिकवण चित्रपटातून मिळाली.’, असे विद्यार्थी मनिष शर्मा म्हणाला.


 

 

Tags: #jalgaon jain company news #maharashtraअनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या २६७ विद्यार्थ्यांनी अनुभवला ‘छावा’ चित्रपट
Previous Post

चटई कामगार तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

शक्ती फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षणाचे आयोजन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शक्ती फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षणाचे आयोजन

शक्ती फाउंडेशनतर्फे पिंक ऑटो रिक्षा प्रशिक्षणाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू
1xbet russia

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना
1xbet russia

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026
क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी
1xbet russia

क्रुझरच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; दोघे जखमी

August 24, 2026
स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन
जैन कंपनी

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

शिरसोली येथील बेपत्ता तरुणाचा नेव्हरे धरणात आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात ? पोलिसांचा तपास सुरू

August 24, 2026
ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

ट्रकच्या भीषण धडकेत ९ वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत; कावड यात्रादरम्यान घडली घटना

August 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon