बालनिकेतन विद्यामंदिर, वाणी विद्यालयात उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) :- प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालय, जळगाव शाळेत ‘दीपोत्सव’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक आणि फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी आणि वर्गशिक्षकांनी घेतली. दिवे लाऊन दिवाळी साजरी करा तसेच फटाके फोडण्याचे दुष्परिणामांविषयी माहिती मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.
याप्रसंगी शाळेचे संचालक वंदन वाणी, मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी व नीलेश नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवर यांच्या हस्ते दिवे लाऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. वाळीनिमित्त नर्सरी ते इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी स्वतः आकर्षक आकाशकंदील, तोरणमाळ, पताका, शुभेच्छा कार्ड, पणत्या, फुगे, रांगोळ्या इ. साहित्य तयार केले. प्रत्येक वर्गामधून सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थाने तयार केलेल्या विविध प्रकारच्या साहित्यातून शालेय इमारत व वर्ग सजावट करण्यात आली. उपक्रमाच्या शेवटी उपस्थित नर्सरी ते १० वी च्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता निकम यांनी केले तर शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले.