वाचा – कोणते आमदार होणार निवृत्त…
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधान परिषदेचे ११ आमदार दि. २७ जुलै रोजी निवृत्त होत आहेत. या रिक्त जागासाठी दि. १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने आज मंगळवारी दि.१८ रोजी जाहीर केला आहे.
या निवडणुकीची अधिसुचना दि. २५ जून रोजी काढण्यात येणार आहे. दि. २ जुलै पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर दि. ३ जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे.दि. ५ जुलै उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख आहे. तर दि. १२ जुलै रोजी मतदान आणि निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दि. २७ जुलै रोजी विधानपरिषदेतून मनिषा कायंदे, विजय गिरकर, अब्दुलाखान दुराणी, निलय नाईक, अनिल परब, रमेश पाटील, रामराव पाटील, वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, महादेव जानकर आणि जयंत पाटील हे विधान परिषदेचे आमदार निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे.