• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महा व रूग्णालयातील बालरोग तज्ञांची कामगीरी

जळगाव (प्रतिनिधी) :- मुदतपूर्व प्रसूतीमुळे जन्मलेल्या कमी दिवसांच्या आणि अत्यंत कमी वजनाच्या नवजात शिशूवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील एनआयसीयू विभागात यशस्वी उपचार करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या वेळेवर केलेल्या उपचारांमुळे या शिशूची प्रकृती सुधारून त्याला नवजीवन मिळाले आहे.
याबाबत माहिती अशी की, किशोर इंगळे (रा. रावेर) यांच्या पत्नीला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिची मुदतपूर्व प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर जन्मलेले शिशू अत्यंत कमी वजनाचे होते. तसेच श्वसनास त्रास, अशक्तपणा आणि शरीरातील आवश्यक कार्ये व्यवस्थित न होणे अशा गंभीर समस्या दिसून आल्या. त्यामुळे शिशूची प्रकृती चिंताजनक बनली होती. शिशूला तातडीने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील अत्याधुनिक एनआयसीयू (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये दाखल करण्यात आले. नवजात शिशू तज्ज्ञ डॉ. सुयोग तन्नीरवार यांनी शिशूची सखोल तपासणी केली. तपासणीअंती शिशूचे वजन अत्यल्प असल्याने त्याच्यावर विशेष निगराणीखाली उपचार सुरू करण्यात आले. एनआयसीयूमध्ये शिशूला आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात आल्या. शरीराचे तापमान नियंत्रित ठेवणे, श्वसनासाठी आवश्यक मदत, संसर्गापासून संरक्षण, तसेच योग्य प्रमाणात पोषण देण्यावर विशेष भर देण्यात आला. डॉक्टर आणि परिचारिका यांच्या सततच्या देखरेखीमुळे शिशूमध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसू लागले.उपचाराच्या पहिल्याच आठवड्यात शिशूच्या वजनात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर नियमित उपचार, पोषण व्यवस्थापन आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे महिनाभरात शिशूची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली. सध्या शिशू पूर्णपणे सुरक्षित असून त्याला घरी सोडण्यात आल्याची माहिती रूग्णालय प्रशासनाने दिली. या उपचारासाठी डॉ. कुशल धांडे, डॉ. ओमश्री गुडे, डॉ. विशाल कोठावदे, डॉ. अस्मिता गायकवाड, डॉ. सृष्टी भिरूड, भारती झोपे यांनी सहकार्य केले.

मुदतपूर्व जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या शिशूंमध्ये अनेक गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी तातडीने योग्य उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. या शिशूवर एनआयसीयूमध्ये अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यात आले. डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि पालकांच्या सहकार्यामुळे शिशूची प्रकृती सुधारण्यास मदत झाली.-

डॉ. ओमश्री गुडे
डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,जळगाव खुर्द

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

Next Post

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा
जैन कंपनी

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस
1xbet russia

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

May 15, 2026
कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण
1xbet russia

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशन सिस्टीम्सला एकत्रित करपश्चात २५.७ कोटींचा नफा

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

यावलमध्ये तरुणांच्या टोळक्याचा धुडगूस

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon