• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विधानपरिषद निवडणूक : कृपाल तुमाणे,भावना गवळी, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील रिंगणात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2024
in क्राईम, जळगाव, भारत, महाराष्ट्र, विश्व
0
विधानपरिषद निवडणूक : कृपाल तुमाणे,भावना गवळी, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील रिंगणात

राष्ट्रवादी अजित पवार गट, काँग्रेसचे नाव प्रतीक्षेत

मुंबई (प्रतिनिधी) : विदर्भातील कृपाल तुमाने आणि भावना गवळी या माजी खासदारांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे. दुसरीकडे, पुरेशी मते नसतानाही शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

भावना गवळी यांना यवतमाळ-वाशीममधून तर कृपाल तुमाने यांना रामटेकमधून उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला होता. त्यामुळे शिंदे गटाने या दोघांना उमेदवारी न देता यवतमाळमधून जयश्री पाटील व रामटेकमधून राजू पारवे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे गवळी व तुमाने नाराज होते. याचा फटका वरील दोन्ही मतदारसंघात महायुतीला बसला व ते पराभूत झाले होते. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत पुरेशी मते नसतानाही शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीच्या तिसऱ्या उमेदवारामुळे मतांची फाटाफूट होण्याची चिन्हे आहेत.

भाजपने पाच उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेसने एकच उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेसची अतिरिक्त मते आणि ठाकरे गटाच्या मतांच्या आधारे नार्वेकर यांचे गणित जमू शकते. पण राष्ट्रवादी शरद पवार गटाने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. विधान परिषदेत निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता आहे. १०३ आमदार असलेल्या भाजपचे अपक्षांच्या मदतीने पाचही उमेदवार निवडून येऊ शकतात. ५० आमदारांचा पाठिंबा असलेल्या शिंदे गटाचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतील. ४२ आमदार असलेले अजित पवार गट दोन उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे.

महायुती ९ जागा जिंकण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. ठाकरे गट व शरद पवार गटाकडील मतांच्या आधारे एक उमेदवार निवडून येईल, पण शिवसेना ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केल्याने समीकरणे बदलली आहेत.महायुती ९ तर महाविकास आघाडी दोन जागा वाटून घेण्याची सत्ताधाऱ्यांची योजना होती. मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील रिंगणात राहिल्यास चुरस वाढू शकते.


 

 

Tags: Bhavana GawliJayant PatilKripal TumaneMilind Narvekar
Previous Post

पोटाच्या आजाराने पोलीस हेड कॉन्स्टेबलचा उपचारादरम्यान अकाली मृत्यू

Next Post

चक्कर आल्याने सायकलीवरून पडल्याने इसमाचा मृत्यू  

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

चक्कर आल्याने सायकलीवरून पडल्याने इसमाचा मृत्यू  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात
1xbet russia

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील
1xbet russia

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी वाढदिवस व आषाढी एकादशीनिमित्त ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’
1xbet russia

लोकमान्य टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात अभिवादन

July 24, 2026
सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी
1xbet russia

सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूलची सुवर्ण कामगिरी

July 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या कार्यकारिणीचा पदग्रहण व सत्कार सोहळा उत्साहात

July 24, 2026
विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण करा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon