जळगाव (प्रतिनिधी) : गोदावरी इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च जळगाव आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवस्थापन शिक्षणातील आधुनिक अध्यापन पद्धतींवर आधारित तीन दिवसीय राष्ट्रीय ऑनलाइन कार्यशाळेचे यशस्वी समारोप करण्यात आला.
’जनरेशन झेड’ आणि ’जनरेशन अल्फा’ विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापन शिक्षणाच्या नाविन्यपूर्ण पद्धतीया विषयावरील या कार्यशाळेला देशभरातील प्राध्यापक, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.झूम या ऑनलाइन माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचा मुख्य उद्देश व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांना डिजिटल युगातील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि विद्यार्थी-केंद्रित अध्यापन तंत्रांची ओळख करून देणे हा होता. कार्यशाळेत देशातील १३० हून अधिक प्राध्यापक आणि संशोधक सहभागी झाले होते.कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी प्रा. सुहास पाटोळेकर यांनी भविष्यातील कॉर्पोरेट क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना सक्षम बनविणार्या व्यवस्थापन शिक्षणाच्या नव्या पद्धतींवर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य देणार्या अध्यापन पद्धतींचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या उद्योगविश्वाच्या गरजांनुसार शिक्षण व्यवस्थेत आवश्यक असलेल्या सुधारणांवरही त्यांनी सविस्तर विवेचन केले.दुसर्या दिवशी डॉ. चारुलता कुलकर्णी यांनी ‘जनरेशन झेड’ विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांच्या शिकण्याच्या पद्धती आणि वर्गात त्यांचे लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्या प्रभावी अध्यापन तंत्रांबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी डिजिटल साधनांचा सकारात्मक आणि परिणामकारक वापर करून अध्यापन अधिक रंजक, प्रभावी व विद्यार्थी-केंद्रित कसे करता येईल याविषयी उदाहरणांसह माहिती दिली.कार्यशाळेच्या अंतिम दिवशी डॉ. अर्पित सिंग यांनी व्यवस्थापन शिक्षणातील औद्योगिक मानसशास्त्र आणि आधुनिक शैक्षणिक तंत्रज्ञानाची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले. विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अध्यापन प्रक्रियेत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येतो, याची माहिती त्यांनी सहभागी प्राध्यापकांना दिली. आधुनिक शिक्षण व्यवस्थेत तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास अध्यापनाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचा सहभाग दोन्ही वाढू शकतात, असे त्यांनी सांगितले.गोदावरी आय.एम.आर.चे संचालक डॉ. प्रशांत एस. वारके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेच्या समारोप सत्रात समन्वयक डॉ. चेतन सरोदे यांनी सर्व प्रमुख वक्ते, मार्गदर्शक तसेच कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणार्या समन्वयक प्रा. स्मिता चौधरी आणि प्रा. पूनम भारुडे यांचे आभार मानले.