उत्सव समिती अध्यक्षपदी भूषण सोनवणे, उपाध्यक्षपदी गणेश सोनवणे
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील वासूमित्रा फाउंडेशनतर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रम यशस्वीतेसाठी समिती नियुक्त करण्यात आली असून अध्यक्षपदी भूषण वासुदेव सोनवणे तर उपाध्यक्षपदी गणेश किसन सोनवणे यांची निवड एकमताने करण्यात आली तर कार्याध्यक्षपदी जयेश पाटील, सचिवपदी संदीप येवले, खजिनदारपदी राहुल देशमुख यांची निवड करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक निघणार आहे.रामेश्वर कॉलनीतील विविध परिसरात हि मिरवणूक असून दुसऱ्या दिवशी दि. २० रोजी संध्याकाळी साडेसात वाजता रूपालीताई सवणे परतुरकर यांचे जाहीर कीर्तनाचे आयोजन केले आहे. शिवजयंती उत्सव समितीच्या सदस्यपदी शशिकांत पाटील, देवेंद्र मराठे, बाळा सोनवणे, प्रशांत सोनवणे, मोहन यादव, पंकज राठोड, शेखर कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे.