मुंबई (प्रतिनिधी) : “केसरीराज न्यूज पोर्टल” चे मुख्य संपादक भगवान सुपडू सोनार यांना मोठ्या आजारातून तसेच मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास आपले वैद्यकीय कौशल्य पणाला लावणाऱ्या मुंबईच्या सेंट जॉर्जेस हॉस्पिटल येथील वैद्यकीय यंत्रणेला “केसरीराज” तर्फे भेटवस्तू देऊन कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.
भगवान सुपडू सोनार यांना व्हायरल निमोनिया आजार झाला होता.या आजारामध्ये त्यांचा जीव धोक्यात आला होता. त्यांना जळगाव येथून तातडीने मुंबई येथील सेंट जॉर्जेस रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. एक महिनाभर सेट जॉर्जेस हॉस्पिटल येथे तेथील वैद्यकीय पथकाने आपले कौशल्य पणाला लावून भगवान सोनार यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते.
त्यामुळे सोनार परिवारातर्फे वैद्यकीय पथकाचे आभार मानण्यात आले होते. मंगळवारी दि. १३ फेब्रुवारी रोजी भगवान सोनार यांना पुनर्तपासणीसाठी बोलावले असता त्यावेळेला “केसरीराज न्यूज पोर्टल”तर्फे सेंट जॉर्जेस हॉस्पिटल येथील आयसीयू कक्ष क्रमांक दोन येथे भेटवस्तू देऊन वैद्यकीय यंत्रणेचा सन्मान करण्यात आला.