महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक परिषदेतर्फे पोलीस अधीक्षकांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) :- माहिती अधिकारात मागितलेली माहिती न मिळाल्याने एका व्यक्तीने थेट वैद्यकीय अधीक्षकांना फोन करून मारहाण करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घडला आहे. दिवसभर जळगावात घटनेचे पडसाद उमटले आहे. महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक परिषदेतर्फे शनिवारी संध्याकाळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंतर्गत कार्यरत असणारे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विजय गायकवाड यांना दि १५ रोजी महेंद्र पाटील नामक व्यक्तीने अर्वाच्च भाषेत फोन करुन सर्व महिला व पुरुष डॉक्टरांना यांना देखील मारेन अशी देखील धमकी दिलेली आहे. तसेच अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर यांच्याबददल देखील अशोभनीय भाषा वापरलेली आहे. सर्व महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना घटनेचा निषेध करीत आहोत व संबंधित महेंद्र पाटील व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्यांत यावी असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना जळगाव अध्यक्ष डॉ. मारोती पोटे, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. हर्षल महाजन, डॉ. रितेश सोनवणे, डॉ. सतीश सुरळकर, डॉ. हेमंत पाटील, डॉ. विलास मालकर, डॉ. नेहा भंगाळे, डॉ. अमित भंगाळे, डॉ. अक्षय सरोदे, डॉ. कुणाल देवरे, डॉ. सुनयना कुमठेकर आदी उपस्थित होते.