जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील दूध फेडरेशन परिसरातील चौकाला जगतगुरु संत रोहिदास महाराज चौक असे शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी नामकरण करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर अश्विन सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. त्यानंतर चौकाच्या फलकाचे अश्विन सोनवणे यांच्या हस्ते नामकरण करण्यात आले. प्रसंगी जगतगुरु संत रोहिदास महाराज चर्मकार बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किशोर धोरे यांनी कार्यक्रमाविषयीची माहिती दिली.
यावेळी उपाध्यक्ष विजय खजूरे, सचिव दीपक मेथे, खजिनदार विजय अहिरे, आरपीआय(खरात) गटाचे जिल्ह्याचे अनिल चंद्रे, सुनील वाघ, संतोष धोरे, विशाल सुरवाडे, विक्की माने, प्रेम सुरवाडे, राजू मोतीराळे, कैलास मेथे, दिलीप धोरे, गणेश धोरे, शालिक सुरवाडे, राजू धोरे, कैलास भारुळे, दशरथ ठाकरे, किरण खंडाळे, विजय भोगे, तुषार अहिरे, बंटी शिर्के, बापू सोनवणे, हिम्मत मोरे, गणेश भारुळे आदींनी परिश्रम घेतले.