उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एण्डोस्कोपी स्पाईन सर्जरी वर्कशॉपचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबरला दुर्बिणीद्वारे मणका शस्त्रक्रिया (स्पाईन सर्जरीचे कॅडेवरीक वर्कशॉप) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस पुणे येथील प्रख्यात अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ.सतीशचंद्र गोरे (फेलो अमेरिकन बोर्ड ऑफ मिनिमली इनवेसिव्ह स्पाइन स्पेशलिस्ट) हे उपस्थीत असणार आहे.
जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक असोसिएशन, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अस्थिरोग विभाग व शरीररचना शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात कॅडेवरीक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत डॉ.सतीशचंद्र गोरे हे मणका शस्त्रक्रियेत दुर्बिणीद्वारे अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब आणि त्याचे फायदे काय हे प्रात्याक्षीकासह लेक्चरद्वारे सांगणार आहे. ह्या प्रकारची कार्यशाळा उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ भागात पहिल्यांदाच होत असून ही अंत्यंत अभिमानाची बाब आहे.
याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडित, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड तसेच जळगाव जिल्हा ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र सरोदे, सचिव डॉ.भुषण झंवर यांच्यासह अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ.दिपक अग्रवाल, शरिररचना शास्त्र विभागप्रमुख डॉ.अमृत महाजन यांच्यासह निवासी डॉक्टर उपस्थीत राहणार आहे.
—-
अॅडव्हान्स स्पाईन सर्जरी रुग्णांसाठी फायदेशीर – डॉ.दिपक अग्रवाल
उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण विदर्भ परिसरात पहिल्यांदाच एंडोस्कोपीद्वारे मणका शस्त्रक्रिया कार्यशाळा होत असून आमच्यासाठी ही अंत्यंत अभिमानाची बाब आहे. अॅडव्हान्स स्पाईन सर्जरीची पद्धती आणि त्याचे प्रशिक्षण कार्यशाळेतून दिले जाणार असून रुग्णांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे.
– डॉ.दिपक अग्रवाल, विभागप्रमुख