संजय राऊत, ऍड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी यांची उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार करण बाळासाहेब पाटील पवार यांच्या प्रचारानिमित्त सभा घेण्यासाठी जळगावात मंगळवारी दि. ७ मे रोजी येत आहेत. संध्याकाळी ५ वाजता त्यांची सभा होणार आहे.
सभेनिमित्त खा. उन्मेष पाटील यांनी सोमवारी दि. ६ रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. सभेनिमित्त शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, ऍड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, खा. उन्मेष पाटील, उमेदवार करण पवार पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, वैशाली सूर्यवंशी आदी उपस्थित राहणार आहेत.
सभेमध्ये उद्धव ठाकरे सत्ताधारी पक्षाच्या कार्याचा समाचार घेणार असून मतदारसंघातील जनतेला आवाहन करणार आहे. सभेत उद्धव ठाकरे, संजय राऊत, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी काय बोलतात याकडे राजकीय क्षेत्रातील व्यक्तींचे लक्ष लागून आहे.