नागपूरात नववर्षच्या सुरुवातीलाच हादरवणारे हत्याकांड
नागपूर (प्रतिनिधी) :- एका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने चक्क आई-वडिलांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आहे. प्रेयसीशी लग्न करायचे होते. मात्र आईने नकार दिला आणि पित्याने तर थेट तिच्यासमोरच चापट मारली. या प्रकाराने हा विद्यार्थ्यी संतप्त झालेला होता. त्याने आईला गळा आवळून मारले तर पित्याला चाकूने भोसकून मारले. आत्महत्या वाटणाऱ्या या घटनेत गेल्या ५ दिवसांपासून पोलीस घटनेचा तपास करीत होते.
नागपूर येथील कपिल नगर भागात या मुलाने आपल्या आई वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर हा मुलगा घराला कुलूप लावून बहिणीच्या घरी निघून गेला. लीलाधर डाखोरे व त्यांची पत्नी अरुणा डाखोरे असे मयत आई वडिलांचे नाव आहे. या इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमधून उघडकीस आली होती. शहराच्या कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद करून कारवाईला सुरुवात केली होती. पण आता या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. संशयित आरोपी उत्कर्ष डाखुळे हा गेल्या वर्षापासून इंजिनियरिंगचं शिक्षण घेत होता. मात्र त्याचे काही पेपर बॅकलॉग राहिले होते.
तो वारंवार नापास होत होता. आई-वडील त्याला दुसरे काहीतरी करण्यासाठी आग्रह करत होते. त्यामुळे तो प्रचंड नाराज होता. या प्रकारातून त्याचे त्याच्या आईवडिलांचे वारंवार वाद व्हायचे. त्यासोबत आणखी एक घटना घडली. विद्यार्थी उत्कर्ष लीलाधर डाखोळे याचे एका वर्गमैत्रिणीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांना प्रेमविवाह करायचा होता. उत्कर्षने प्रेयसीला घरी बोलावले आणि आई-वडिलांशी भेट घालून दिली. मात्र, त्यावेळी आईने चक्क नकार दिला होता तर वडिलांनी उत्कर्षला त्याच्या प्रेयसीसमोरच कानाखाली मारली होती. त्यामुळे, उत्कर्षला आई वडीलांंवर राग होता.
त्यामुळे त्याने आईचा गळा आवळून तर वडिलांचा चाकूने भोसकून खून केल्याचे समोर आले आहे. दरम्यान या हत्याकांडात उत्कर्षचा कोणीतरी साथीदार असावा असा संशय पोलीसांना आहे. आम्ही आमच्या मर्जीने आत्महत्या करीत आहेत. शवविच्छेदन करू नका. आमच्या मुलांना त्रास देऊ नका. मृतदेह थेट अंत्यसंस्कारासाठी घेऊन असा मेसेज उत्कर्षच्या वडिलांच्या मोबाईलवर होता. त्यामुळे सुरुवातीला हे आत्महत्येचे प्रकरण वाटले होते. पण तपासानंतर हे सर्व मुलानेच केल्याचे समोर आले आहे.