• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

थकीत देयकांसाठी कंत्राटदारांचे राज्यभर उद्या आंदोलन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 7, 2021
in महाराष्ट्र
0

मुंबई ( प्रतिनिधी ) – सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना खात्याकडे कंत्राटदारांची हजारो कोटींची बिले प्रलंबित आहेत. या थकीत देयकांसाठी आता कंत्राटदारांची संघटना राज्यभर उद्या आंदोलन करणार आहे

सतत पाठपुरावा करूनदेखील कोविडच्या नावाखाली देयके निघत नाहीत. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया संघटनेकडून राज्यभर उद्या प्रत्येक जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे रणधीर भोईटे यांनी दिली. भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीस विश्वस्त जवाहर मुथा, माजी अध्यक्ष अविनाश पाटील, कंत्राटदार समिती चेअरमन महेश गुंदेचा, राज्य सचिव दिलीप शिंदे, अभय चोक्सी, मनोज मोरे, अभिषेक कौल तसेच राज्यातील इतर शासकीय ठेकेदार सदस्य सहभागी झाले होते.
केवळ १५ ते २० % पर्यंतच निधी देऊन ठेकेदारांची चेष्टाच केली आहे. मिळालेल्या निधीत ठेकेदारांना बँकेचे व्याज, हफ्ते, कामगारांचे पगार, मजुरांचे पगार, मशिनरीचे इंधन व मेंटेनन्स, पुरवठादारांचे देणे चुकवणे अशक्य होते . ठेकेदारांचे देणे थकल्यामुळे अडचणीत सापडले आहेत . खाजगी सावकार, घरातले सोनेनाणे सर्व तारण ठेवल्यानंतर आज ठेकेदारांच्या हातात काहीच उरलेले नाही. एका शासकीय ठेकेदारावर कमीतकमी १५० ते २०० लोकांची उपजीविका अवलंबून असते. पर्यायाने सर्व आज अडचणीत आले आहेत. प्रत्येकवेळी ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, चक्रीवादळ इ.मुळे शासन सर्वप्रथम ठेकेदारांच्या देण्यावरच वजावट करते. लोकप्रतिनिधी विकासाचे जे स्वप्न पाहतात ते काम पूर्ण करण्यासाठी सर्व कामे निधी उपलब्ध आहे नाही हे न पाहता शासकीय ठेकेदार पूर्ण करतात. परंतु देयके अदा करताना संबंधित खात्याच्या मंत्री, अर्थमंत्री कुठल्याही प्रकारे ठेकेदारांचा विचार करत नाही ही खेदाची बाब आहे.

जवाहर मुथा यांनी सांगितले की, २० महिन्यांपासून सर्व ठेकेदार अडचणीत आहेत काही दिवसापूर्वीच एका शासकीय ठेकेदाराने देयके अडकल्यामुळे खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता दिवाळी तोंडावर येऊन सुद्धा देयके मिळत नाहीत. एकीकडे दोन वर्ष बिले देत नाही व दुसरीकडे कोणतेही बजेटचे प्रयोजन नसताना नवीन कामे सरकार काढत आहे व कंत्राटदारांना अडचणीत आणत आहे.

दिवाळीपूर्वी देयक मिळाली नाहीतर अधिक तीव्र आंदोलन करू, आर्थिक प्रयोजन नसताना नवीन कामे काढले जात आहेत या विषयावर कोर्टात खेचण्याचा इशारा बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने दिला आहे. यावर्षीही जास्त प्रमाणात पावसामुळे सर्वच रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. कोविडच्या परिस्थितीत शासकीय ठेकेदारांनी निधी उपलब्ध नसताना सामाजिक बांधिलकी पाळत खड्ड्यांची कामे केली होती. परंतु यावर्षी दिवाळीपूर्वी देयके मिळाली नाही तर खड्ड्यांचे कामे न करून शासनास विरोध करून इशारा देण्याचा निर्णय घेण्यात आला.


 

 

Previous Post

धरणगावात पोलिसांची धाड ; धान्यसाठा जप्त !

Next Post

मेहरूणच्या हनुमाननगरात मोफत तपासणीसह औषधी वितरण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मेहरूणच्या हनुमाननगरात मोफत तपासणीसह औषधी वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
1xbet russia

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी
1xbet russia

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

June 17, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

दुचाकीसाठी एक लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पती व सासूविरुद्ध गुन्हा

June 16, 2026
डिझेल चोरी करणाऱ्या भामट्यांना मुक्ताईनगर पोलिसांनी सिनेस्टाईल पकडले !
1xbet russia

उसन्या पैशांच्या वादातून लोखंडी रॉडने हल्ला; दोघे अटकेत

June 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

चाळीसगावात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon