जळगाव,: गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रथम वर्षाच्या नवोदित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्यांनी कृषी क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून केवळ पदवीपेक्षा प्रात्यक्षिक ज्ञानाला अधिक महत्त्व आहे, असे स्पष्ट केले. महाविद्यालयातील कृषी कॅम्पस, प्रयोगशाळा आणि संशोधनाच्या सुविधा विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धीसाठी महत्त्वपूर्ण असून, प्रत्येक प्रात्यक्षिक उपक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, कृषी कॅम्पस, प्रयोगशाळा व संशोधन सुविधांचा पुरेपूर उपयोग करून नियमित वर्गांना उपस्थिती राखावी, असे आवाहन करण्यात आले.
नियमित वर्गांना उपस्थित राहिल्याने विषयांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात तसेच प्राध्यापकांशी थेट संवाद साधता येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शंभर टक्के उपस्थितीचे ध्येय ठेवून शिक्षणासोबत प्रात्यक्षिक अनुभवही आत्मसात करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कृषी व अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक चौधरी, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पूनमचंद सपकाळे, उपप्राचार्य प्रविण देवरे, प्रशासकीय अधिकारी मोहन सूर्यवंशी यांच्यासह प्रा. शरद पाटील, प्रा. निलेश सदर, प्रा. वैभव पाटील, डॉ. ज्ञानेश्वर सिंग, डॉ. अंकित आलोक, प्रा. कार्तिक खर्चे, प्रा. गौरव बाविस्कर, प्रा. सुशील चव्हाण, प्रा. प्रियल राठी, प्रा. सायली विधाटे, प्रा. जागृती ठाकरे, प्रा. माधुरी भोळे आदी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया देशमुख व पार्थ पवार यांनी केले. डॉ. ज्ञानेश्वर सिंग यांनी आभार मानले.









