• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

रस्ते अपघातातील तरुणाच्या मेंदूवरील गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 3, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रस्ते अपघातातील तरुणाच्या मेंदूवरील गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांचे यश

जळगाव ( प्रतिनिधी ) – खरगाव येथील लंगाडा अंबा परिसरातील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय तरूणाच्या मेंदूला अपघातामुळे झालेल्या गंभीर दुखापतीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील मेंदू व मणका विकार तज्ज्ञांकडून यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्याचे प्राण वाचले.

डॉक्टरांची तत्परता आणि वेळ या दोन्ही गोष्टी या शस्त्रक्रियेत महत्वाच्या ठरल्या. याबाबत माहिती अशी की, लंगडाअंबा परिसरातील दयाराम बारेला (२४) यांना रस्ते अपघातात गंभीर अपघात होऊन डोक्याला दुखापत झाली.

अपघातानंतर त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात आणण्यात आले त्यावेळी दयाराम बरेला हे बेशुद्ध अवस्थेत होते. याठिकाणी मेंदू व मणका विकार तज्ज्ञ डॉ. विपूल राठोड यांनी त्यांच्या प्रकृतीची तातडीने तपासणी करून उपचार सुरू करण्यात आले.रुग्णाची एनसीसीटी ब्रेन तपासणी करण्यात आली.

या तपासणीत डोक्याच्या डाव्या कपाळाच्या भागात डिप्रेस्ड स्कल फ्रॅक्चर म्हणजेच कवटीचे हाड तुटून आतल्या बाजूला दाबले गेल्याचे आढळून आले. तसेच फ्रॅक्चरच्या खालील भागात मेंदूला कंट्युजन म्हणजे दुखापतीमुळे मेंदूच्या ऊतींना झालेली जखम असल्याचे निदान झाले. रुग्ण बेशुद्ध असल्याने तसेच मेंदूला गंभीर दुखापत झाल्याचे निदान झाल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.रुग्णाला पुढील गुंतागुंत होऊ नये आणि मेंदूवरील दाब कमी करता यावा, यासाठी त्याच दिवशी डीकम्प्रेसिव्ह क्रेनिएक्टॉमी विथ इव्हॅक्युएशन ऑफ हेमॅटोमा ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेद्वारे मेंदूवरील वाढलेला दाब कमी करण्याबरोबरच साचलेले रक्त (हेमॅटोमा) बाहेर काढण्यात आले.

गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णावर वेळ न दवडता तातडीने शस्त्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे ठरले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. पोस्ट-ऑपरेटिव्ह काळात कोणतीही मोठी गुंतागुंत झाली नाही. उपचारांना रुग्णाने चांगला प्रतिसाद दिला. सुरुवातीला बेशुद्ध अवस्थेत असलेला रुग्णाची प्रकृती आता सुधारत आहे. शस्त्रक्रियेसाठी डॉ. विपूल राठोड यांना डॉ. प्रितम दास व टीमने सहकार्य केले.

तसेच ही शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेंतर्गत मोफत करण्यात आली. कोट.. रस्ते अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर रुग्णाला शक्य तितक्या लवकर तज्ज्ञ वैद्यकीय उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. बेशुद्धावस्था, डोक्याला गंभीर मार, उलट्या, झटके किंवा प्रतिसाद न देणे अशी लक्षणे दिसल्यास विलंब न करता रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. दयाराम बरेला यांच्या प्रकरणात वेळेत रुग्णालयात दाखल करून आवश्यक तपासण्या आणि तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीत समाधानकारक सुधारणा झाली आहे.

– डॉ. प्रितम दास, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कृषी विज्ञान केंद्र, पालला ‘Best KVK Performance Award – 2025’

Next Post

विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती

विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला
क्राईम

बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला

October 3, 2026
विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती
खान्देश

विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती

October 3, 2026
रस्ते अपघातातील तरुणाच्या मेंदूवरील गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया
खान्देश

रस्ते अपघातातील तरुणाच्या मेंदूवरील गंभीर दुखापतीवर यशस्वी शस्त्रक्रिया

October 3, 2026
कृषी विज्ञान केंद्र, पालला ‘Best KVK Performance Award – 2025’
खान्देश

कृषी विज्ञान केंद्र, पालला ‘Best KVK Performance Award – 2025’

October 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला

बहिणीला घेऊन जाण्याच्या कारणावरून तरुणावर लोखंडी कुऱ्हाडीने हल्ला

October 3, 2026
विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती

विकास विद्यालयात ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमातून जनजागृती

October 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!