जळगाव ( प्रतिनिधी ) – महापालिकेची ऑनलाईन महासभेच्या अजेंड्यावरील पहिल्याच विषयावर शिवसेनेच्या स्विकृत नगरसेवक निवडीवरून सभागृहात गोंधळ उडाला. भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले. सर्वपक्षीय गटनेत्यांची आधी बैठक घेवून त्यात निर्णय घेतला पाहिजे होता; असा मुद्दा भाजप सदस्यांनी मांडला.यामुळे गोंधळ झाल्याने अखेर महापौरांनी विशेष महासभा तहकुब केली.
पहिलाच विषय शिवसनेच्या स्विकृत नगरसेवकपदी विराज कावडीया यांच्या निवडीच्या मुद्यावरून भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडले. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य आमने- सामने आल्याने महासभेत गोंधळ झाला.
भाजप- शिवसेना सदस्यांमध्ये गोंधळ झाला. यावेळी शिवसेनेचे दिपील पोकळे यांच्या नावाच्या गटनेता पदाची नावावरून भाजपच्या सदस्यांनी विरोध केला. भाजपच्या अँड. शुचिता हाडांनी गटनेता पद भाजपचे असून शिवसेनेने चुकिच्या पद्धतीने निवड केली विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या गटनेत्याची नोंद आहे. त्यामुळे ही निवड चुकीची असल्याचे सांगितले . यावेळी भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, जितेंद्र मराठे, डॉ. अश्विन सोनवणे यांनी शाब्दीक हल्ला केला.