जळगाव शहरात रामेश्वर कॉलनीत घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- घरामध्ये स्वयंपाक करत असताना अचानक आगीचा भडका उडाल्यामुळे गंभीररित्या भाजलेल्या ५० वर्षीय महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी दि. २२ मे रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उषा गुलाब मोरे (वय ५०, रा. रामेश्वर कॉलनी) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. उषाबाई यांचा मुलगा दिनेश हा रिक्षा चालवून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे.(केसीएन) दरम्यान, रामेश्वर कॉलनी येथील घरात एक महिन्यापूर्वी दि. २४ एप्रिल रोजी त्या स्वयंपाक करीत होत्या. तेव्हा अचानक आगीचा भडका उडून उषाबाई मोरे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. त्या गंभीररित्या भाजल्या होत्या. त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर गेल्या आठ दिवसांपूर्वी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.(केसीएन)रुग्णालयात त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे मेहरूण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.