• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

६७ कोटींची वीजबिल थकबाकी, वीजचोरीतील कारवाईत हलगर्जीपणा; महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांचे निलंबन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 20, 2026
in Uncategorized
0
महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

६७ कोटींची वीजबिल थकबाकी, वीजचोरीतील कारवाईत हलगर्जीपणा; महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांचे निलंबन

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव मंडलातील वाढते रोहित्र बिघाड, कोट्यवधी रुपयांची वीजबिल थकबाकी आणि वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये अपेक्षित कारवाई न केल्याचा ठपका ठेवत महावितरणच्या जळगाव मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता विनोद चंद्रकांत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. कोकण प्रादेशिक विभाग, कल्याणचे सह व्यवस्थापकीय संचालक तथा सक्षम अधिकारी दिलीप जगदाळे यांनी १९ ऑगस्ट २०२६ रोजी निलंबनाचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे महावितरणच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रोहित्र बिघाडाचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक

निलंबन आदेशानुसार, पाटील यांच्या कार्यक्षेत्रातील चोपडा शहरी उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेच्या मुख्य पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गंभीर बिघाड झाला होता. याशिवाय संपूर्ण जळगाव मंडलातील रोहित्र नादुरुस्तीचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले.

महावितरणच्या अहवालानुसार, २०२५-२६ मध्ये रोहित्र बिघाडाचे प्रमाण १०.२६ टक्के होते. तर २०२६-२७ साठी स्वीकारार्ह मर्यादा ४.२० टक्के निश्चित करण्यात आली होती. बिघाडाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी वेळोवेळी निर्देश देऊनही क्षेत्रीय पातळीवर अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

६७ कोटींची वीजबिल थकबाकी

तांत्रिक बिघाडासोबतच महसूल वसुलीच्या बाबतीतही गंभीर दुर्लक्ष झाल्याचे चौकशीत आढळून आले. मागील तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठी प्रभावी मोहीम राबविण्यात आली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

परिणामी, जुलै २०२६ अखेर जळगाव मंडलातील वीजबिल थकबाकी ६७ कोटी १४ लाख ७९ हजार रुपये इतकी झाली.

वीजचोरीच्या २,१६९ प्रकरणांवर कारवाई नाही

जळगाव मंडलात वीजचोरीची ३ हजार १६४ प्रकरणे उघडकीस आली होती. मात्र, त्यापैकी तब्बल २ हजार १६९ प्रकरणांमध्ये दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्यात आली नसल्याचे आदेशात नमूद आहे. त्यामुळे महावितरणच्या महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचेही निदर्शनास आले.

निलंबन काळात आठवड्यातून दोनदा हजेरी

महावितरणच्या सेवाविनियमांनुसार हे वर्तन गंभीर स्वरूपाचे गैरवर्तन ठरत असल्याचे नमूद करून सक्षम अधिकाऱ्यांनी पाटील यांच्यावर तात्काळ प्रभावाने निलंबनाची कारवाई केली.

निलंबन काळात विनोद पाटील यांना दर सोमवार आणि शुक्रवार सकाळी १० वाजता नाशिक परिमंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयात प्रत्यक्ष हजेरी नोंदवावी लागणार आहे. तसेच सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

निलंबन कालावधीत नियमानुसार त्यांना मूळ वेतनाच्या ५० टक्के तसेच पूर्ण महागाई भत्त्यासह निर्वाह भत्ता देण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous Post

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

Next Post

अवैध दारूसह वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाची धडक मोहीम

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवैध दारूसह वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाची धडक मोहीम

अवैध दारूसह वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाची धडक मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूसह वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाची धडक मोहीम
1xbet russia

अवैध दारूसह वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाची धडक मोहीम

August 20, 2026
महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित
Uncategorized

६७ कोटींची वीजबिल थकबाकी, वीजचोरीतील कारवाईत हलगर्जीपणा; महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांचे निलंबन

August 20, 2026
युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर
जैन कंपनी

फोटोग्राफी म्हणजे जुन्या आठवणी जिवंत करण्याची जादू- अनिल जैन

August 19, 2026
युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी डॉ. सिमा पाटील, कार्याध्यक्षपदी डॉ. सोनाली महाजन, उपाध्यक्षपदी उषा जैन तर स्वागत समिती प्रमूखपदी डॉ. कल्याणी नागूलकर

August 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अवैध दारूसह वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाची धडक मोहीम

अवैध दारूसह वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाची धडक मोहीम

August 20, 2026
महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

६७ कोटींची वीजबिल थकबाकी, वीजचोरीतील कारवाईत हलगर्जीपणा; महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांचे निलंबन

August 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!