यावल (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध किर्तनकार ह. भ. प. सुर्यभानजी महाराज शेळगांवकर यांना निसर्गमित्र समिती, धुळेच्या वतीने राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बालकिर्तनकार म्हणुन महाराजांनी संपुर्ण राज्यात प्रसिद्धी प्राप्त केली असुन, जळगांव जिल्ह्यातील जळगांव तालुक्यातील तापी तिरावर बसलेल्या शेळगांव गावात ह. भ. प. सुर्यभान महाराज यांचा जन्म झाला. आई वडील शेतकरी असून बालपणापासुन महाराजांना संत कृपा झाली. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात व इतर राज्यांपर्यन्त वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन आपल्या कथा किर्तनातुन महाराज ज्ञानप्रबोधन करतात.
नुकताच राजश्री शाहू महाराज नाटयगृह धुळे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ह. भ. प. सुर्यभान महाराज यांना अगोदर देखील महाराजांना शब्द प्रभुधर्म भुषण पुरस्कार प्राप्त आहेत. साधु संप्रदायातर्फे महामंडलेश्वर हे पदसुद्दा प्राप्त आहे. उत्तर महाराष्ट्रात कमी वयात पुरस्कार प्राप्त करणारे महाराज पहिलेच किर्तनकार आहेत. महाराजांचे संबंध वारकरी संप्रदायात कौतुक होत आहे