
जळगाव ( प्रतिनिधी ) – माजी आमदार सुरेशदादा जैन यांचा घरकूल गैरव्यवहार प्रकरणात आजवर अंतरीम जामीन मिळाला होता. आता मात्र कोर्टाने त्यांना नियमीत जामीन दिला आहे.



घरकूल प्रकरणी माजी आमदार सुरेशदादा जैन यांना कोर्टाने अंतरीम जामीन दिला होता. मात्र आज न्यायालयाने त्यांना नियमीत जामीन दिला आहे. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, सुरेशदादा जैन यांना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच जळगावातील दादा समर्थकांमध्ये उत्साहाचे वारे संचारले असून शहरात फटाके फोडून याचे स्वागत करण्यात आले आहे.
