फुलगाव येथे ३१ वर्षीय तृतीयपंथीयाची आत्महत्या


वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
वरणगाव, ता. भुसावळ : फुलगाव येथे तुषार (तानिया) उर्फ अनंत बाऊस्कर (वय ३१) या तृतीयपंथीयाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार उर्फ तानिया बाऊस्कर हे फुलगाव येथील रहिवासी होते. १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी दुसऱ्या मजल्यावरील पंख्याच्या हुकला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत ते आढळून आले.घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय व नागरिकांनी पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ गणेश राठोड पुढील तपास करीत आहेत.









