जळगाव;- घरातून काही कामानिमित्त बाहेर गेलेल्या ४० वर्षीय एसटी कंडक्टरचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना बांभोरी येथील अभियांत्रिकी समोर आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घटना घडली .
राजेद्र किसन केवारे (वय ४०रा.पिंप्राळा) असे मयत कंडक्टरचे नाव आहे .राजेंद्र केवारे हे एसटी महामंडळात वाहक आहेत. पाच मिनिटात बाहेरून जाऊन येतो असे सांगून घरून बांभोरी येथे निघाले होते. दुचाकी (एमएच १९- ५२४३) ने परतत असताना एसएसबीटी महाविद्यालयासमोर एका अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना साडेअकरा वाजेच्या दरम्यान झाला. राजेंद्र केवारे याची नुकतीच धुळे डेपो येथून जळगाव डेपोला बदली झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी योगिता, कुणाल आणि सुमित असे दोन मुले असा परिवार आहे. पाळधी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते . याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .