नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीतील राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या देशातील सर्वात लहान कोरोना बाधित रूग्णाला लक्षणे नसल्याने रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. पाच दिवसांच्या या निरागस बाळाला देशातील सर्वात कमी वयाचा कोरोना रुग्ण म्हटले जात आहे. सध्या या बाळाला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. खरं तर, 13 मे रोजी रुग्णालयात एका कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेने मुलाला जन्म दिला. नीकू चे डॉ. तापस आणि इतर डॉक्टरांनी मुलाची पाच दिवसांनंतर 18 मे रोजी तपासणी केली असता कोरोना संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. डॉक्टरांनी मुलाला सावधगिरीने ठेवले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की जेव्हा फक्त पाच दिवसांच्या मुलास कोरोना इन्फेक्शन होते तेव्हा आम्ही योग्य ती काळजी घेतली आणि मूल पूर्णपणे स्वस्थ आहे.
डॉक्टरांनी सांगितले की मूल घरी कुटुंबासोबत आहे. तेथे मुलास सावधगिरीने स्तनपान देण्यास सांगितले आहे. रुग्णालयाची टीम दिवसातून दोनदा कॉल करते आणि मुलाच्या आरोग्यासंबंधी विचारपूस करते. सध्या मूल पूर्णपणे स्वस्थ असून 14 दिवसांनंतर पुन्हा मुलाची तपासणी केली जाईल.
डॉ. राहुल चौधरी म्हणाले की नुकत्याच झालेल्या संशोधनांनुसार प्रौढांपेक्षा मुलांना कोरोनापासून कमी धोका आहे. एका संशोधनानुसार, मुलांच्या नाकातील एपिथेलियम ऊतींमध्ये कोविड -19 रिसेप्टर एसीई 2 चे प्रमाण खूप कमी असते. अमेरिकेच्या माउंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांना असे आढळले आहे की सार्स-सीओव्ही -2 कोणत्याही सजीव शरीरात प्रवेश करण्यासाठी रिसेप्टर एसीई 2 चा वापर करतो.
दिल्लीतील पटेल नगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीच्या या मुलास जरी कोरोनाचा संसर्ग झाला असेल परंतु त्याच्यात कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत. आरएमएल रुग्णालयाच्या नवजात रोग विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. राहुल चौधरी यांनी सांगितले की या मुलाला ताप किंवा इतर कोणतीही लक्षणे नाहीत. मुलाचे कोरोना संसर्ग वगळता इतर तपासणी अहवालही सामान्य आले आहेत. त्यामुळे आम्ही मुलाला हॉस्पिटलमधून घरी सोडले. बर्याच संशोधनात असे आढळले आहे की कोविड -19 चा विषाणू मुलांच्या फुफ्फुसांकडे जात नाही तर तो वरच्या भागात म्हणजे नाक, तोंड, घशापर्यंतच मर्यादीत असतो आणि त्यांच्यामध्ये सर्दी खोकला यासारख्या किरकोळ तक्रारी असतात. हेच कारण आहे की मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे प्रौढांसारखी दिसत नाहीत आणि विषाणूमुळे त्यांच्यात मृत्यू उद्भवत नाही.