• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लॉकडाऊन काळात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाईत केमिकल व रंगयुक्त डाळ जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 13, 2020
in जळगाव
0

जळगांव;- संबंध देशामध्ये कोव्हिड -19 च्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने लॉकडाऊन असताना या काळात खाण्याच्या पदार्थाची मागणी वाढल्याने त्यामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले, अशा प्रकारच्या तक्रारी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने या विभागाने लॉकडाऊन या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये देखील गोपनीय माहितीच्या आधारे एम.आय. डी. सी जळगाव येथे शनिवार ह्या सुट्टीच्या दिवशी एका डाळ मिल वर धाड टाकून त्याठिकाणी उडीद मोगर व मुंग डाळीचे उत्पादन विक्रीसाठी तयार असल्याचे आढळले.

या दाल मिलमध्ये उडीद मोगर या डाळीला लावण्यात येणारे सॉफ्ट स्टोन पावडरचा 146 किग्रॅ साठा (5 कट्टे) घटनास्थळी आढळले. सदर पावडरचा उपयोग हा उडीद मोगर डाळीमध्ये केलेला आढळला. तसेच मुग डाळ या अन्नपदार्थास खाद्यरंग लावल्याचे आढळले.

परिस्थितीजन्य स्थिती बघता अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी श्री विवेक पाटील यांनी घटनास्थळी असलेल्या सॉफ्ट स्टोन पावडरचा नमुना भेसळकारी पदार्थ म्हणून घेवून उडीद मोगर या केमिकलयुक्त डाळीचा 2388 किग्रॅ साठा रितसर नमुना घेवून जप्त केला. तसेच व मुग डाळीस अन्न सुरक्षा मानके कायद्याप्रमाणे रंग लावण्याची परवानगी नसल्याने रितसर नमुना घेवून शिल्लक साठा 758 किग्रॅ हा जप्त केला. एकूण साठ्याची किंमत रुपये 2,43,182/- इतका आहे.

याप्रकरणी घेतलेले नमुने विश्लेषणासाठी पाठविले असता अन्न विश्लेषकाने उडीद मोगर या नमुन्यात अन्न सुरक्षा मानके कायद्याप्रमाणे परवानगी नसलेले केमिकल टल्क पावडर हे आढळून आले असल्याचे कळविले आहे. तसेच मुंग मोगर या डाळीच्या नमुन्यात खाद्यरंग लावल्याचे घोषित केलेले आहे.

याप्रकरणी पुढील तपास अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील हे करत असून या प्रकरणी अन्न सुरक्षा कायद्याप्रमाणे दोषीवर योग्य ती कारवाई केली जाईल. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यो.को. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलक आहे. यापुढेही अशा प्रकारे खाद्यपदार्थात भेसळ करणा-या व भेसळ करुन जनतेची दिशाभुल करणा-या विक्रेत्यांवर प्रशासनामार्फत कार्यवाही सुरु राहील. जनतेने खाद्यपदार्थ खरेदी करताना सतर्कता बाळगून खाद्यपदार्थांची खरेदी करावी. असे सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.


 

 

Previous Post

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर डॉ. अरुण हुमणे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती

Next Post

राज्यात दिवसभरात 6,497 कोरोना रुग्ण आढळले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

राज्यात दिवसभरात 6,497 कोरोना रुग्ण आढळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ
1xbet russia

जळगाव तालुक्यातील हॉटेल परिसरात दरोडेखोरांचा धुमाकूळ

June 13, 2026
अखेर महायुती फायनल सर्व उमेदवारांची यादी वाचा एका क्लिकवर
1xbet russia

विधान परिषद निवडणूक महायुतीची बैठक संपन्न

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon