महिलेच्या बदनामीप्रकरणी जळगावात गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका गावातील ३९ वर्षीय महिलेच्या नावाने सोशल मीडियावर बनावट इंस्टाग्राम खाते तयार करून आक्षेपार्ह मजकूर टाकून महिलेची बदनामी करण्यात आली आहे. याप्रकरणी शुक्रवार दि. ७ जून रोजी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा फोटो वापरून तिचा पत्ता टाकून बनावट इंस्टाग्राम खाते तयार करण्यात आले. ते खाते फिर्यादीचे असल्याचे भासविण्याचा प्रयत्न करून त्यावर आक्षेपार्ह मजकूरदेखील टाकण्यात आला. यातून सदर महिलेची बदनामी झाली. हा प्रकार लक्षात येताच महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.