शिरपूर (प्रतिनिधी) : श्रीराम ठिबक हे आपल्या उच्च गुणवत्ता, माफक दर व विक्री पश्चात सेवेमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपुर्ण भारतातील शेतकर्यांच्या पसंतीला व विश्वासाला पात्र ठरले आहे. कंपनीचे अध्यक्ष श्रीराम पाटील म्हणतात, जे देणार ते उत्तम देणार, क्वॉलिटीचे देणार भरवश्याचे देणार, या विश्वासावरच सिका ई मोटर्सची सुरुवात केली.
उत्तम गुणवत्ता आकर्षक रंग, उच्च दर्जाची बॅटरी व मोटर, लवचिक व टिकाऊ शॉकप, मजबूत बॉडी व चालायला सोपी असल्याने थोड्याच कालावधीत ती चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीला उतरली आणि अगदी थोड्या कालावधीतच सिका ई बाईकच्या वितरकांचे जाळे संपर्ण महाराष्ट्रात घट्ट विणले गेले. घटस्थापनेच्या शुभमुुहुर्तावर शिरपूर येथील सिका ई बाईकचे वितरक योगेश चतुर बारी यांच्या भार्गवी ई मोटर्स शोरूमचे उद्घाटन श्रीराम उद्योग समुहाचे अध्यक्ष श्रीराम पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमास मालतीबाई बारी, चतुर बारी, संगिता बारी, हिमांशू, भार्गवी, भुषण बारी, मिलिंद मोरे, पियुष बारी, सुनिल बारी, अनंत बागुल, सुरज कोलते आदी उपस्थित होते.