• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 4, 2026
in जैन कंपनी, 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

६८५ महिला गोविंदांचा कसून सराव; १५ संघांना दहीहंडी फोडण्याची समान संधी

प्रवेश विनामूल्य; ६३ हजारांची रोख पारितोषिके अन् १० लाखांचा अपघाती विमा

जळगाव ( प्रतिनिधी ) –नारीशक्तीचा साहसी आविष्कार, युवतींच्या धाडसाचा थरार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा जल्लोष अनुभवण्याची संधी जळगावकरांना शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी मिळणार आहे. भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाउंडेशनतर्फे आयोजित ‘युवतींची दहीहंडी २०२६’ हा भव्य सोहळा सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत शिवतीर्थ मैदान (जी.एस. ग्राउंड) येथे रंगणार आहे. या सोहळ्यासाठी १५ महिला गोविंदा पथकांमधील तब्बल ६८५ युवतींचा कसून सराव सुरू असून, त्यांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार पाहण्याची उत्सुकता जळगावकरांमध्ये निर्माण झाली आहे.

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-03-at-16.37.10.mp4

या दहीहंडी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सहभागी होणाऱ्या युवतींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. प्रत्येक महिला गोविंदाचा १० लाख रुपयांचा अपघाती विमा आयोजकांकडून उतरविण्यात आला आहे. दहीहंडीचा हा उत्सव सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातील युवतींनी, कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नारीशक्तीच्या या धाडसी उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन युवतींच्या दहीहंडी उत्सव समितीच्या स्वागत समिती प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले.

१५ संघ, ६८५ महिला गोविंदा

किड्स गुरूकूल इंटरनॅशनल, अनुभूती स्कूल, आर.आर. इंग्लिश मीडियम स्कूल, उडाण फाऊंडेशन, केसीई मुलींचे वसतिगृह, अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, एल.एच. पाटील पब्लिक स्कूल आणि हरिजन कन्या छात्रालय आदी शाळा-महाविद्यालयांमधील १५ संघ सहभागी होत आहेत. या संघांमधून तब्बल ६८५ महिला गोविंदा युवती सहभागी होणार असून, त्यांच्या साहसी मानवी मनोऱ्यांचा थरार शिवतीर्थावर अनुभवता येणार आहे.

स्पर्धा नव्हे, उत्सव; सर्वांना समान संधी

दहीहंडीच्या माध्यमातून साहसासोबतच समता आणि समान संधीचा संदेश देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. हा केवळ स्पर्धेचा कार्यक्रम नसून उत्सव आहे, हे अधोरेखित करण्यासाठी सहभागी होणाऱ्या सर्व १५ संघांना दहीहंडी फोडण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी मैदानावर १५ दहीहंड्या उभारण्यात येणार आहेत.

युवतींसाठी ६३ हजारांची रोख पारितोषिके

मागील वर्षीच्या दहीहंडीच्या समारोपावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी युवतींसाठी रोख पारितोषिके देण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेची यंदा पूर्तता करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाच्या संघाला ३१ हजार १११ रुपये, द्वितीय क्रमांकाला २१ हजार १११ रुपये, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला ११ हजार १११ रुपये, अशी एकूण ६३ हजार ३३३ रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट साहसी खेळाचे प्रदर्शन करणाऱ्या युवतींचाही विशेष स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार असून, सहभागी सर्व संघांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

 

https://kesariraj.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-03-at-18.36.25.mp4

२१३ ढोलवादकांचा दणदणाट; लेझर शो अन् आतषबाजी

युवतींच्या दहीहंडीचा थरार वाढविण्यासाठी विविध सांस्कृतिक आणि साहसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शौर्यवीर’ आणि ‘महाबली’ या दोन ढोल पथकांमधील तब्बल २१३ ढोलवादक आपल्या दमदार वादनाने वातावरण दणाणून सोडणार आहेत. मर्दानी खेळ, चिमुकल्यांसाठी सांस्कृतिक नृत्य, रिदमिक योगा, लाईव्ह सिंगिंग, स्लाईन डीजे, लेझर शो आणि आकर्षक फटाक्यांची आतषबाजी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
शहरातील १५ रिल्स स्टार युवतींचाही या उत्सवात सहभाग राहणार असून, त्यामुळे तरुणाईमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे. चिमुकल्यांसाठी मल्लखांबासह विविध साहसी खेळांचे प्रदर्शनही या वेळी पाहायला मिळणार आहे.

नारीशक्तीच्या सामर्थ्याचा जागर करणाऱ्या या अनोख्या सोहळ्यास जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवतींच्या धाडसाला दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

 

Tags: https://kesariraj.com/shivtirthavar-dahihandi/
Previous Post

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

Next Post

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी
जैन कंपनी

१५ वर्षातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे उद्या आयोजन

September 4, 2026
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!
जैन कंपनी

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!
जैन कंपनी

शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

September 4, 2026
डॉ. वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात
1xbet russia

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वरिष्ठ गटाच्या आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेची निवड प्रक्रिया रविवारी

१५ वर्षातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे उद्या आयोजन

September 4, 2026
शिवतीर्थावरील युवतींच्या दहीहंडीला उदंड प्रतिसाद!

उत्सुकता शिगेला… शिवतीर्थावर युवतींची दहीहंडी! देशाचा गौरव वाढविणाऱ्या महिला खेळाडूंना

September 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon