कास्ट्राईब संघटनेसह विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत व सत्कार
जळगाव ( प्रतिनिधी ) – शितल लेकुरवाळे-सावळे यांची पदोन्नतीने जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, जळगाव या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेसह विविध विभागांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.

यावेळी कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटन सचिव नुपम मेढे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघ नाशिकचे विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, कास्ट्राईब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना जळगावचे जिल्हाध्यक्ष सुरेश वाडे, विभागीय उपाध्यक्ष दिनेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार पाटील, महिला उपाध्यक्षा ममता मेढे-बेहेरे यांच्यासह राहुल बारी, जयदीप गाढे व अभिषेक पाटील उपस्थित होते.
तसेच महसूल विभागाचे योगेश अडकमोल, महसूल जिल्हाध्यक्ष महेश सपकाळे, सुनील कराटे, संदीप खैरे, कोषागार विभागाचे रवींद्र गायकवाड, कृषी विभागाचे किशोर मराळे, पाटबंधारे विभागाचे जिल्हाध्यक्ष सचिन सपकाळे, सचिव भाऊजी हटकर, कार्याध्यक्ष विकी गोंधळी आणि गुरुनाथ शेंगदाणे यांच्यासह कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जळगावचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शितल लेकुरवाळे-सावळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.







