• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी

डंपरच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय; गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 30, 2026
in Uncategorized
0
अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी

अवैध रेती वाहतुकीमुळे शिरसोली ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा पाइपलाइन फुटली; जिल्हाधिकाऱ्यांकडे दंडात्मक कारवाईची मागणी

डंपरच्या निष्काळजीपणामुळे लाखो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय; गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत

शिरसोली ते कुऱ्हाडदे ,दापोरा रस्त्याची दयनीय अवस्था

जळगाव | प्रतिनिधी

शिरसोली प्र.न. गावातून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरमुळे ग्रामपंचायतीची मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन फुटल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले असून संपूर्ण गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या प्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून अवैध रेती वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक यांच्याकडे २३ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

ग्रामपंचायतीच्या माहितीनुसार, दापोरा रस्त्यालगत जाणाऱ्या मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइनवरून २२ जुलै २०२६ रोजी अवैधरित्या रेती वाहतूक करणारा भरधाव डंपर गेल्याने पाइपलाइन व एअर व्हॉल्वचे मोठे प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पाइपलाइनला गळती लागून मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी वाया गेले. परिसरात पाणी साचल्याने नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.या घटनेनंतर शिरसोली गावातील पाणीपुरवठा खंडित झाला असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायतीने संबंधित डंपर चालक व अवैध रेती वाहतुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनात गावातून सुरू असलेली अवैध रेती वाहतूक तात्काळ थांबविणे, संबंधित डंपरची चौकशी करून नुकसानभरपाई व दंडात्मक कारवाई करणे, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची विनंती करण्यात आली आहे.

डम्पर चालकांचा शिरसोली प्र.न. बस स्टॅन्ड चौकात ठिय्या

रात्री उशिरापर्यंत अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर चालक हे चहा पिण्यासाठी शिरसोली प्र.न. गावातील बसस्टँड परिसरात अत्यंत उर्मटपणे थांबुन येणाऱ्या जाणाऱ्यांना दमदाटी करीत टवाळक्या करीत बसल्याने गावाच्या शांततेच्या भंग होत असल्याने गावातील सुरक्षितता धोक्यात आली आहे. त्यामुळे सामान्य ग्रामस्थ आणि वाळू माफियांमध्ये शाब्दिक चकमक आणि वादाचे किरकोळ प्रकार घडत असून यातून एखादा वाद निर्माण होऊन याचे रूपांतर मोठ्या घटनेत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिरसोली ते कुऱ्हाडदे दापोरा रस्त्याची चाळणी

कोट्यवधी रुपयांची शिरसोली ते कुऱ्हाडदे दापोरा रस्त्याची कामे करण्यात आली असून दिवसरात्र अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर हे बेफाम वेगाने जात असल्याने या रस्त्याची अक्षरशः वाट लागल्याचे दयनीय चित्र असून या अवैध वाळू वाहतुकीला महसूल आणि पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी आता परिसरातील नागरिकांकडून होत आहे. तसेच अत्यंत वेगाने जाणाऱ्या या वाहनांमुळे मोठा घातपात होण्याचीही शक्यता आहे. प्रशासनाने या रस्त्याची कामे युद्धपातळीवर करून रस्ता पूर्वीसारखा चांगले बनवावा अशी मागणी जोर धरत आहे.

 


 

 

Previous Post

बारी समाज माध्यमिक विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

Next Post

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

अमळनेरात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन; ११३ संशयितांची तपासणी, शस्त्रांसह विविध गुन्ह्यांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत
क्राईम

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग
क्राईम

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
जैन कंपनी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 21, 2026
गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल
1xbet russia

गणेश विसर्जनाला जाण्यास वडिलांचा नकार; १२ वर्षीय मुलाने उचले टोकाचे पाऊल

September 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

माशांचे जेवण वडिलांना न दिल्याच्या किरकोळ कारणावरून मित्राची हत्या; दोन आरोपी अटकेत

September 22, 2026
भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

भुसावळ एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

September 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon