जळगाव (प्रतिनिधी) :- खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचा नामकरण समारंभ गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर होणार आहे. या महाविद्यालयाचे नाव “व. पु. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय” असे राहील, अशी माहिती प्राचार्य डॉ. अशोक राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषद बुधवारी दुपारी महाविद्यालयाच्या मीटिंग हॉलमध्ये झाली. नामकरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून एन.सी.टी.ई. वेस्टर्न रिजनल कमिटी (नवी दिल्ली) चे सदस्य आणि यवतमाळ येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुहासकुमार आर.पाटील राहतील.
प्रा. वसंतराव पुरुषोत्तम होले आणि रजनी वसंतराव होले या सत्कारमूर्ती आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू व्ही.एल. माहेश्वरी राहतील. पत्रकार परिषदेला शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.निलेश जोशी, ज्ञानेश्वर वाघ आदी उपस्थित होते.