• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 10, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

मनपा स्थायी समितीच्या सभेत अंदाजपत्रकावर चर्चा

जळगाव – स्थायी समितीच्या सभेत महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मंगळवारी साडेआठ कोटींचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले आहे. १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून त्यावर समिती अभ्यास करणार आहे. त्यानंतर हे अंदाजपत्रक महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

नवीन नगरसेवक निवडीनंतर महापालिकेची पहिलीच स्थायी समितीची सभा सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी व्यासपीठावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त प्रशासन निर्मला पेखळे गायकवाड, नगरसचिव सतीश शुक्ला हे उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती यांचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर आयुक्त ढेरे यांनी सन २०२५-२६ चे सुधारीत आणि सन २०२६-२७ चे मुळ अंदाजपत्रक सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्याकडे सादर केले. अंदाजपत्रकातील तरतुदी, जमा-खर्च यासंबंधीच्या विषयावर आयुक्त ढेरे यांनी सभागृहात निवेदन सादर केले. मालमत्ता करापासून सन २०२५-२६ मध्ये रक्कम रू. ११८ कोटी इतके सुधारित उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले असून, शहरातील मालमत्तांचे वार्षिक भाडे मूल्य निर्धारणांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मनपाचे उत्पन्नात साधारणपणे ५ कोटी रुपयांची वाढ होणार आहे.

या अपेक्षित वाढीसह सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात मालमत्ता करापासून १२४ कोटी इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आलेले आहे. तसेच अतिशय जुनी व जीर्ण झालेली प्रभाग समिती क्र. ३ व ४ चे कार्यालय नुतनीकरणासाठी नविन ईमारत उभारण्याचे नियोजन केलेले आहे. जळगाव महानगरपालिकेचा गाळेसंदर्भातील प्रस्ताव अन्वये २ व ३ टक्केप्रमाणे आकारणी करण्याबाबत शासनास मंजुरीकरिता पाठविण्यात आलेला आहे. महानगरपालिकेच्या स्वतःच्या उत्पन्नापैकी व्यापारी संकुलातील गाळ्यांपासून मिळणारे उत्पन्न ही प्रमुख बाब आहे.

जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत म.न.पा. मालकीच्या जागेवर एकूण ९२ जागांवर जाहिरात बॅनर, फलक प्रदर्शित करणेकामी स्ट्रक्चर उभारून सदर जागेवर जाहिरात प्रसिद्ध करण्याकरिता अभिकर्त्याची नेमणूक करण्याबाबत निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यातुन मनपासाठी आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जळगाव शहर महानगरपालिका हद्दीत व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकांकडून लायसन्स फी / परवाना फी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यानुसार जळगाव शहर महानगरपालिका
हद्दीतील व्यवसायिकांना विहित शुल्क आकारून, व्यवसाय परवाना देण्याची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.

जळगाव महानगरपालिकेच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३०% क्षेत्रफळात मलनिसारण योजनेची कामे पूर्ण करण्यात आलेली असून कामांची कार्यान्वित सन २०२४ मध्ये करण्यात आलेली आहे. यापूर्वी महानगरपालिका क्षेत्रात मलनिस्सारण योजना नव्हती. महानगरपालिकेने मलनिस्सारण योजनेचे एकूण पाच पैकी दोन चे काम पूर्ण करून ४८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा मल प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला असून ऑगस्ट २०२४ पासून यशस्वीरित्या सुरू आहे. सदर कामा अंतर्गत महानगरपालिकेने ४८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा मलप्रक्रिया प्रकल्प, २०० किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या, मल उपसा केंद्र ही कामे पूर्ण केलेली आहेत.

महिला व बालकल्याण या विभागासाठी अंदाज पत्रकात रक्कम रु.२कोटी ५० लक्ष रुपयांची तरतुद सुचविण्यात आली महिला व बालकल्याण, दिव्यांग कल्याण या घटकांसाठी आवश्यकतेप्रमाणे मागील वर्षामधील अखर्चीत तरतुद उपलब्ध करुन देण्यास आम्ही कटीबध्द आहोत.जळगाव महानगरपालिकेतर्फे लवकरच शहराकरीता ई बस सेवा सुरू करण्याचे नियोजन असून त्यासाठी प्राथमिक स्तरावर शहरातील मार्ग निश्चीत करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

बैठकीला नितीन लढ्ढा, दीपक सूर्यवंशी, नितीन सपके, मानसी भोईटे, कल्पेश सोनवणे, सुरेश सोनवणे, वंदना इंगळे, अरविंद देशमुख, विष्णू भंगाळे, गणेश सोनवणे, सागर सोनवणे, ॲड. दिलीप पोकळे, नरेंद्र पाटील, इब्राहिम पटेल हे सदस्य उपस्थित होते.


 

 

Previous Post

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

शांतता निर्मितीच्या प्रक्रियेत तरुणांचा सहभाग महत्त्वाचा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon