• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शेतकरी संघटनेच्या आंदोलनास स्वतंत्र भारत पक्षाचा जाहीर पाठिंबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 2, 2021
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0

पारोळा – तक्रारीची पोहोच मागितली म्हणुन शेतकरी संघटनेच्या माजी जिल्हाध्यक्षांना मारहाण करणार्‍या पोलिसावर कारवाई न केल्यास स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटना, दैठणा पोलीस स्टेशनला कुलुप ठोकणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, डॉ.पृथ्वीराज श्रीराम पाटील यांनी प्रसिद्दीस दिली आहे.
शेतकरी संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष माधव शिंदे यांच्या गावातील एका शेतकर्‍याने स्वताच्या शेतात तणनाशक फवारले. निष्काळजीपणे तणनाशक फवारल्यामुळे शेजारच्या ४ – ५ शेतकर्‍यांच्या उभ्या पिकाचे नुकसान झाले. त्यात माधव शिंदे यांच्या पिकाचे ही नुकसान झाले. माधव शिंदे त्या गावचे तंटामुक्ती समितीचे ही अध्यक्ष आहेत. सलोख्याने प्रश्न मिटविण्यासाठी हे सर्व शेतकरी, फवारणी करणार्‍या शेतकर्‍याकडे गेले असता तो शेतकरी अरेरावी करत या शेतकर्‍यांवर कुर्‍हाड घेऊन धावला. प्रकरण गावात मिटण्यासारखे नाही असे दिसताच, माधव शिंदे व इतर शेतकरी तक्रार नोंदविण्यासाठी दैठणा पोलीस स्टेशन, ता.जि. परभणी येथे गेले. सर्व शेतकर्‍यांनी आपआपले तक्रारी अर्ज दाखल केल्या नंतर झेरॉक्स प्रतीवर पोहोच मागितली. याचा राग येऊन ड्युटीवर असलेला पोलीस बळीराम मुंडे याने माधव शिंदे यांना शिविगाळ करत, धक्काबुक्की केली व चेहर्‍यावर दोन जोरदार चापटी मारल्या. अनेक लोकांसमोर हा प्रकार घडला व तेथील सी सी टिव्ही कॅमेर्‍यात ही सदर घडलेली घटना चित्रित झाली आहे.
दि. २३ जून रोजी घडलेल्या प्राकाराची लेखी तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे त्याच दिवशी केली असून अपराधी पोलिसावर तातडीने कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे नेते गोविंद जोशी व जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी केली होती. आठवडा उलटला तरी दोषी पोलीसावर कारवाई न करता गुन्हेगार पोलीसाला पाठीशी घालण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, अनिल घनवट यांनी लक्ष घालून, पोलीसावर निलंबनाची कारवाई व केलेल्या अपराधा बद्दल गुन्हे दाखल न केल्यास, दि. ५ जुलै रोजी दैठणा पोलीस स्टेशनला कुलुप ठोकण्याचे आंदोलन जाहीर केले आहे. शेतकरी संघटनेच्या या आंदोलनास स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष भगवानराव बोराडे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील सर्व तालुक्यातील पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात येत असून राज्यभारातील शेतकरी संघटनेचे व स्वतंत्र भारत पक्षाचे कार्यकर्ते कुलुप ठोकण्याच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती, स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, डॉ.पृथ्वीराज पाटील यांनी तहसीलदार गावंडे व पारोळा पोलीस निरिक्षक संतोष भंडारे यांना पत्रकाद्वारे निवेदन दिली आहे. निवेदन देतांना सचिन भिला पाटील, शेतकरी नेते बाळू नाना पाटील व भिम आर्मी संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र वानखेडे उपस्थित होते.


 

 

Previous Post

जिल्ह्यात २० कोरोनाबाधित रुग्ण आढळले ; ६२ जणांची कोरोनावर मात

Next Post

शिवरे दिगर येथे आमदारांच्या हस्ते दूध डेअरीचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिवरे दिगर येथे आमदारांच्या हस्ते दूध डेअरीचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न
1xbet russia

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
1xbet russia

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 6, 2026
महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न
1xbet russia

महाराष्ट्र राज्य ट्रायथलॉन व ॲक्वाथलॉन अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात संपन्न

August 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

August 6, 2026
नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

नशामुक्त भारत अभियानांतर्गत उद्बोधन व प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon