शेंदूर्णी (प्रतिनिधी) – शिवसेनेचा वर्धापन दिन महाराष्ट्रभर शिवसेनेतर्फे विविध कार्यक्रम राबवून साजरा करण्यात येतो , त्यानिमित्त शेंदुर्णी शिवसेना शहर च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन शहरात करण्यात आले होते. वर्धापन दिनाचे औचित्य साधून शेंदुर्णी शहरात कोरोना काळात स्थानिक डॉक्टर, वकील व पत्रकार महोदयांनी जीवाची बाजी न लावता जनतेचीआपापल्यापरीने लोकडाऊन असताना आपल्या सेवा सुरू ठेऊन खरोखरच सेवा केली ,त्यामुळे त्यांचा सन्मान शेंदूर्णी शिवसेनेतर्फे शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा उपप्रमुख डॉ. मनोहर पाटील यांची विशेष उपस्थिती होती, पहूर दरवाजा येथील शिवभोजन केंद्रावर डॉ. मनोहर पाटील यांच्या हस्ते मोफत भोजन वाटप करण्यात आले, तद्नंतर पाण्याच्या टाकी शेजारील सोयगाव रोड वरील नियोजित कार्यक्रमास्थळी शेंदुर्णी शहरातील कोरोना योद्धय्यांचे स्वागत/ सत्कार सेना पदाधिकार्याच हस्ते करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख डॉ. मनोहर पाटील,मा,श्री ड्रा सुनील अग्रवाल उपतालुका प्रमुख डॉक्टर असोसिएशन चे अध्यक्ष श्री देवानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष श्री भूषणभाऊ गरुड, अजय सुर्वे व सर्व सदस्यतसेच पत्रकार संघटना, वकील मंडळी पोलिस कर्मचारी, विधानसभा क्षेत्र प्रमुख मा,श्री नीलकंठ भाऊ पाटील,युवासेना उपजिल्हाप्रमुख मा,श्री विश्वजितराजे पाटील,मा,श्री adv भरत पवार साहेब,शेतकरी संघटनेचे गोपाल भाऊ, जामनेर शहर प्रमुख अतुल भाऊ सोनवणे, जामनेर उपशहर प्रमुख भैय्याभाऊ,जेष्ठ शिवसैनिक बारकू जाधव,अशोक दादा बारी, सिदु पाटील,रमेश भोसले,अरुण गवळी,बापू बारी,रवी पवार,भूषण बडगुजर, शिवसैनिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.