• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे आरोपी नाहीत ; ईडीचा खुलासा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 26, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

मुंबई – अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) नोंदवण्यात येणारा ईसीआयआर (एन्फोर्समेट केस इन्फोर्मेशन रिपोर्ट) हा प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नसून तो तपास सुरू करण्यापूर्वी नोंदवला जाणारा पहिला अधिकृत दस्ताऐवज असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात ईसीआयआर नोंदवला गेला असला तरी ते आरोपी नाहीत. केवळ चौकशीसाठी त्यांना बोलावले जात असल्याचा युक्तिवाद सोमवारी उच्च न्यायालयात ईडीने केला.

ईडीने ऑक्टोबर २०२० मध्ये भोसरी जमीन संपादनप्रकरणी नोंदवलेला ईसीआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी खडसे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच ईडीच्या कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

ईसीआयआर म्हणजे काही एफआयआर नसल्यामुळे ईसीआयआर नोंदवला जाण्याने कोणी आरोपी होत नाही. खडसेंबाबतही तेच आहे. ईसीआयआर त्यांच्याविरोधात नोंदवण्यात आला असला तरी ते काही आरोपी नाही. तसेच केवळ चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आलेले असून ईसीआयआर रद्द करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्यामुळे खडसे यांनी ईसीआयआर रद्द करण्यासाठी केलेली याचिका दाखल करण्यायोग्य नाही, असा युक्तिवाद ईडीतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाच्या काही निकालांचा त्यांनी दाखला दिला, त्यानुसार सार्वजनिक कार्यालये सांभाळणाऱ्यांनी त्यांच्या पदाचा आदर राखणे ती त्यांची नैतिक जबाबदारी असल्याचे म्हटले आहे. हे निकाल लक्षात घेता खडसे यांना कोणताही दिलासा दिला जाऊ नये, अशी मागणीही सिंह यांनी केली. त्याचप्रमाणे चौकशीसाठी समन्स बजावण्यात आल्याने ते रद्द करावे आणि यापुढे समन्स बजावण्यापासून तपास यंत्रणेला मज्जाव करण्याची मागणी केली जाऊ शकत नसल्याचा दावाही ईडीने खडसे यांच्या मागण्यांना विरोध करताना सोमवारी केला. न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी २८ जानेवारीपर्यंत तहकूब केल्याने खडसेंवर तोपर्यंत कठोर कारवाई केली जाणार नाही, असे ईडीतर्फे सांगण्यात आले.


 

 

Previous Post

बॅँकेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने म्हसावदच्या तरुणाला ९३ हजारांचा गंडा

Next Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्रजासत्ताक दिनानिमित्त शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon