चांदोरकर प्रतिष्ठानचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) – मुकेश यांच्या जन्म शताब्दी वर्षाची सांगता दि. २२ जुलै २०२३ रोजी होत असून या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या कलावंतांनी गायलेल्या गीतांचे सादरीकरण करून मुकेश यांना आदरांजली वाहिली.
सुरवातीला जळगाव शहरातील कलाकार गिरीश मोघे व . राजेंद्र उर्फ बापू बाविस्कर तसेच चांदोरकर प्रतिष्ठानचे विश्वस्त व उपाध्यक्षा दत्ता सोमण त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व हा कार्यक्रम त्यांना अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शुभांगी भारदे (उप-जिल्हाधिकारी) व भालचंद्र पाटील (व्यवस्थापकिय संचालक, वेगा केमिकल्स प्रा. लि.) म्हणून उपस्थित होते. दीपक चांदोरकर यांनी गुरुवंदना सादर केली. मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले.
मुकेश यांच्या गाण्यांचा प्रवास जळगावचे ज्येष्ठ कलाकार आर. डि., वैशाली शिरसाळे, प्राजक्ता केदार व ऐश्वर्या परदेसी यांनी उलगडून दाखविला. कलावंतांनी या कार्यक्रमात गीते सादर केली. भुली हुयी यादे, हमे इतना ना सताओ, आ लौटके आजा मेरे मित बुलाते है, किसी राह मे किसी मोडपर, ओ मेरे सनम, फुल तुम्हे भेजा है खतमे, क्या खुब लगती हो अशी एक ना अनेक अजरामर गीतं सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर यांनी केले तर ऋण निर्देश दिपक चांदोरकर यांनी केले.