अमळनेर (प्रतिनिधी) :- शहरातील सराईत गुन्हेगार खुनाच्या गुन्हासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तन्वीर शेख मुस्ताक (वय २७, रा. जुना पारधीवाडा, अमळनेर ) मोक्काची कारवाई व प्रतिबंधक कारवाया होऊन देखील त्याच्या कसलीही सुधारणा दिसून न आल्याने अखेर त्याची एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून २० रोजी पहाटे त्याला ठाणे कारागृहात रवाना करण्यात आले.
तन्वीर हा पेट्रोलपम्प मालक बाबा बोहरी यांच्या खुनातील आरोपी होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, बंद घरात घरफोडी, चोरीचे सात गुन्हे, पेट्रोल पंपावरील चोऱ्या, दुकानाचे शटर तोडून चोरी, दंगली, शासकीय कामात अडथळा असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याच्यावर मोक्काची कारवाई करण्यात आली होती. प्रतिबंधक कारवाई करूनही तो सुधारत नसल्याने अखेर त्याच्यावर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचे आदेश काढण्यात आले.