छत्रपती शिवाजी नगर परिसरात आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) :- संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात भव्य मिरवणूक शनिवारी दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता काढण्यात आली. मिरवणुकीत भाविकांनी ढोलताशांच्या गजरात जल्लोष केला. यावेळी लहान मुलांसह महिला-पुरुषांनी उत्साहात सहभाग घेतला.
येथील जगतगुरु संत रोहिदास महाराज चर्मकार बहुद्देशीय संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष किशोर धोरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. विशेष सजविलेल्या बग्गीत महाराजांची प्रतिमा ठेवलेली होती. ढोलताशांच्या गजरात समाजबांधवांनी जल्लोष केला. यावेळी महिला-पुरुषांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला.
जयंती मिरवणूक हि शिवाजीनगर उड्डाणपूल जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघाली. मिरवणूक उड्डाणपूल मार्गे छत्रपती शिवाजीनगर परिसरात दूध फेडरेशन जवळून राजमालती नगरातील संत रोहिदास महाराजांच्या मंदिरात विसर्जित झाली. याठिकाणी संत रोहिदास यांच्या पुतळ्याला आ. सुरेश भोळे यांनी माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. प्रसंगी सचिव दीपक मेथे यांनी संत रोहिदास महाराज यांच्याविषयी माहिती दिली.
मिरवणूकीत उपाध्यक्ष विजय खजूरे, सचिव दीपक मेथे, खजिनदार विजय अहिरे यांच्यासह संजय अहिरे, विक्रम हिरे, लखन जिरे, छोटू धोरे, भाईदास कासवे, सुनील वाघ, संतोष धोरे, शालिक सुरवाडे, राजू मोतीराळे, कैलास महाले, दिलीप धोरे, गणेश धोरे, राजू धोरे, कैलास भारुळे, कैलास सावकारे, बापू सोनवणे, गणेश भारुळे, नरेंद्र विसावे, बाबू सोनवणे, गणेश मोरे, सुनील विसावे यांच्यासह शेकडो समाजबांधवांनी सहभाग घेतला.