• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 6, 2026
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

महापौर दीपमाला काळे यांचे नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन

जळगाव  ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांत समाधानकारक पाऊस न पडल्याने राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व १५ तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे नेते तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या आवाहनानुसार जळगाव शहर महानगरपालिकेने पाणी नियोजनासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मंगळवारी (दि. ६) महापौर दीपमाला काळे यांनी पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक घेऊन शहरातील पाणी पुरवठा आणि नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस पाणीपुरवठा विभाग प्रमुख घृष्णेश्वर साळुंखे यांच्यासह संबंधित अभियंते व अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शहरातील पाण्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीत माहिती देताना महापौरांनी सांगितले की, सुदैवाने मागील काळात वाघूर धरणात पाण्याचा साठा व्यवस्थित जतन करून ठेवण्यात आल्यामुळे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत त्याचा मोठा आधार व लाभ शहराला मिळत आहे. धरणात पुढील जून महिन्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, हे पाणी जूनपर्यंत टिकवण्यासाठी सर्वांनी काटेकोरपणे पाणी बचत करणे अत्यंत आवश्यक आहे. शहरात अनेक भागांत गरजेपेक्षा जास्त वेळ पाणी राहून ते वाया जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शहरातील सर्व भागांचा सर्व्हे करून पाणी पुरवठ्याची वेळ समान निश्चित केली जाईल, जेणेकरून कुठेही पाणी सांडणार नाही, असे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले.

नळांना तोट्या बसवणे बंधनकारक; दोन दिवसांनंतर होणार कारवाई
शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या घरगुती व व्यावसायिक नळांना तत्काळ तोट्या (कॉक्स) बसवून घ्याव्यात. ज्यांच्या नळांना तोट्या नसतील किंवा जे पाणी वाहू देतील, अशांवर पुढील दोन दिवसांनंतर महानगरपालिकेकडून थेट दंडात्मक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. शहरात कुठेही पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी त्याची माहिती फोटोसह महानगरपालिकेला द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येईल.

उघड्या नळांमधून किंवा पाईपद्वारे गटारात पाणी सोडणे, धुळीसाठी किंवा स्वच्छतेसाठी रस्त्यावर पाणी मारणे, पाईपने वाहनांवर पाणी मारून गाड्या धुणे अशा प्रकारे पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांचे फोटोसहित पुरावे प्राप्त होताच त्यांच्यावर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर दीपमाला काळे यांनी दिला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी ओळखून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


 

 

Tags: jilhyat-dushkalache-sankat
Previous Post

चिनावल येथे २७ वर्षीय तरुणाची गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!
खान्देश

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

October 6, 2026
चिनावल येथे २७ वर्षीय तरुणाची गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या
क्राईम

चिनावल येथे २७ वर्षीय तरुणाची गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या

October 6, 2026
अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७३ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास
क्राईम

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७३ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

October 6, 2026
जळगावात तरुणीवर अत्याचाराचा आरोप; तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
क्राईम

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा आरोप; तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा

October 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट : पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई..!

October 6, 2026
चिनावल येथे २७ वर्षीय तरुणाची गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या

चिनावल येथे २७ वर्षीय तरुणाची गावठी कट्ट्यातून गोळी झाडून आत्महत्या

October 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon