
पिंप्राळा परिसरातील घटना; रामानंद नगर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा
जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको, गुलशन नगर परिसरात उभ्या असलेल्या रिक्षांमधून अज्ञात चोरट्याने विविध कंपन्यांच्या पाच बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी रात्री ९ ते १४ जुलै रोजी सकाळी ७ या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्याने ग्लोबल कंपनीची ४ हजार रुपये किमतीची, एक्साईड कंपनीच्या ८ हजार व ७ हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या, अमरॉन कंपनीची ५ हजार रुपये किमतीची तसेच लिवगार्ड कंपनीची ६ हजार रुपये किमतीची बॅटरी अशा एकूण ३० हजार रुपये किमतीच्या पाच बॅटऱ्या चोरून नेल्या.
याप्रकरणी फिरोज खान युनूस खान (वय ४६, व्यवसाय – रिक्षाचालक, रा. पिंप्राळा हुडको, गुलशन नगर, जळगाव) यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड करीत आहेत.









