• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 17, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हृदयविकाराने त्रस्त महिलेची जोखमीची प्रसूती यशस्वी

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांची उल्लेखनीय कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी) – हृदयविकाराने त्रस्त असलेल्या आणि यापूर्वी हृदयावर शस्त्रक्रिया झालेल्या २४ वर्षीय गर्भवती महिलेची अत्यंत जोखमीची प्रसूती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी यशस्वीरीत्या करून आई व बाळाचे प्राण वाचवले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या समन्वयातून आणि वेळेवर दिलेल्या उपचारांमुळे ही प्रसूती यशस्वी झाली.
कल्पना (बदललेले नाव) या २४ वर्षीय महिलेवर यापूर्वी गंभीर हृदयविकारामुळे हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा स्थितीत त्या गर्भवती राहिल्याने संपूर्ण गर्भधारणेचा कालावधी अत्यंत जोखमीचा मानला जात होता. दरम्यान, त्यांना हृदयाचा त्रास, पाठीचे दुखणे तसेच पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी महिलेची तपासणी केली. त्यानंतर मेडिसीन विभागातील तज्ज्ञ डॉक्टरां मत जाणून घेत हृदयाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले. हृदयाची पूर्वीची शस्त्रक्रिया आणि सध्याची प्रकृती लक्षात घेता प्रसूतीदरम्यान आईच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे मेडिसीन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. साक्षी, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश या टिमने प्रसूतीची सविस्तर योजना तयार केली.त्यानुसार आई व गर्भाच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. आवश्यक त्या सर्व तपासण्या करून तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, मेडिसीन विभाग आणि प्रशिक्षित परिचारिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून अत्यंत काळजीपूर्वक प्रसूती करण्यात आली. अखेर ही जोखमीची प्रसूती यशस्वी ठरली आणि आईसह बाळाची प्रकृती स्थिर राहीली. रुग्णाच्या नातेवाईकांनीही रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व वैद्यकीय कर्मचार्‍यांचे आभार मानले. अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉक्टरांनी दाखविलेली तत्परता, अचूक निर्णयक्षमता आणि तज्ज्ञ उपचारांमुळे आई आणि बाळाला नवजीवन मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांमध्ये गर्भधारणा आणि प्रसूती ही नेहमीच उच्च जोखमीची असते. अशा रुग्णांमध्ये प्रसूतीदरम्यान हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे मेडिसीन तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि वेळेवर उपचार यामुळे ही प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती चांगली असून आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

– डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.

 

 

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रिक्षांमधील पाच बॅटऱ्या चोरी; ३० हजारांचा ऐवज लंपास

Next Post

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

डॉ. प्रशांत कुमार गुड्डेटी यांना पीएच.डी. पदवी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ
क्राईम

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी एलिटतर्फे हात धुण्याबाबत जनजागृती

October 17, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
खान्देश

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पतीला कामावर लावण्यासाठी २ लाखांसाठी विवाहितेचा छळ

घर बांधकामासाठी माहेरून ५ लाख आणण्याची मागणी

October 17, 2026
मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

मेहुणबारे येथे प्रतिबंधित पानमसाला व तंबाखूची वाहतूक उघड; ५.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

October 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon