डोंबिवलीच्या अभिनेत्री तरुणीला सुखद अनुभव, जळगावची दुपारची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- ठाणे जिल्ह्यातील एक अभिनेत्री तरुणी जळगावात त्यांच्या नाटकाच्या कामानिमित्त आल्या होत्या. त्यावेळी जळगाव शहरात रिक्षा प्रवासात त्यांचा मोबाईल फोन खिशातून रिक्षात पडला. त्यांच्या ते लक्षात आले नाही. मात्र हा फोन त्यांना प्रामाणिकपणे एका तरुण रिक्षाचालकाने मदत करून दुसऱ्या रिक्षाचालकाकडून संपर्क करून परत मिळवून दिला. यामुळे माणुसकी जिवंत असल्याचे चित्र दिसून आले.
सायली पावसकर ह्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथे राहतात. त्यांनी विविध नाटकांत काम केले आहे. जळगावात पुढील महिन्यात होणाऱ्या एका नाटकाच्या प्रयोगाकरिता त्या जळगावात आल्या होत्या. त्यावेळी त्या रिंगरोड ते पिंप्राळ्यातील छत्रपती शिवाजी चौकात रिक्षाने जात असताना त्यांचा मोबाईल फोन खिशातून पडला.त्यांनी फोन शोधला, मात्र तो मिळून येत नव्हता. (kesariraj spatial news) काही वेळाने त्यांनी जेथे रिक्षातून उतरले त्या स्टॉपजवळ आल्या. तेथे मुस्तकीम अली (रा. पिप्राळा हुडको) या रिक्षाचालकाला घटनेबाबत सांगितले.
मुस्तकीम अली यांनी त्यांच्या संपर्कातील रिक्षाचालकांना संपर्क केला. त्यात मोहसीन या रिक्षाचालकाच्या रिक्षात तो फोन असल्याचे दिसून आले. मुस्तकीम यांनी संपर्क करून मोबाईल फोन घेऊन सायली पावसकर यांना मिळवून दिला. यावेळी सायली पावसकर यांनी रिक्षाचालक मुस्तकीम अली व मोहसीन यांना धन्यवाद दिले. (kesariraj spatial news) जळगावात मी नवीन आहे, त्यातच पहिल्या दिवशी हरवलेला फोन परत मिळाल्याने माणुसकीचे दर्शन झाले, अशी प्रतिक्रिया “केसरीराज” शी बोलताना त्यांनी दिली.