• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
रस्ता सुरक्षा बळकटीकरणासाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

जिल्हा नियोजन सभागृहात एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन

जळगाव ( प्रतिनिधी ) :- जिल्ह्यात रस्ता सुरक्षेची व्याप्ती वाढवणे तसेच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आज रस्ता सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. जिल्हा प्रशासन आणि आयआयटी मद्रासच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रोड सेफ्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली.

प्रशिक्षण सत्रात डॉ. रोशन जोश तसेच मुख्य प्रकल्प अधिकारी प्रदीप कुमार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रस्ते सुरक्षेसंदर्भातील माहिती ऑनलाइन प्रणालीद्वारे नोंदविण्याची प्रक्रिया, अपघातप्रवण क्षेत्रांची ओळख पटविणे, त्यांचे नियमित सर्वेक्षण करणे आणि आवश्यक त्या उपाययोजना राबविणे याबाबत सविस्तर प्रात्यक्षिक देण्यात आले.

अपघातग्रस्त किंवा अपघातप्रवण भागांजवळ उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आणि आपत्कालीन साधनसामग्रीचे मूल्यमापन कसे करावे, याविषयीही सविस्तर माहिती देण्यात आली. अपघातानंतर तातडीने मदत पोहोचविण्यासाठी विविध विभागांमधील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या प्रशिक्षण सत्राच्या प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी रस्ते अपघात कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, खबरदारी तसेच सर्व विभागांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन बुरुड, नायब तहसीलदार रवींद्र उगले यांच्यासह पोलीस, परिवहन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, महानगरपालिका व नगरपालिका विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

आधुनिक तंत्रज्ञान, माहिती व्यवस्थापन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा प्रभावी वापर करून जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यशाळेच्या शेवटी कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

“अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणातून मिळालेली माहिती प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणल्यास जिल्ह्यातील जीवितहानी कमी करण्यास मोठी मदत होईल.”

— आर. डी. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव


 

 

Tags: #jalgaon jimaka newsrasta-surksha-balkatikarnasathi
Previous Post

मेहरूण परिसरामधून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; एमआयडीसी पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

अपघातानंतर जीवन-मरणाच्या संघर्षात मृत्यूशी झुंज देणार्‍या तरुणाला नवजीवन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
1xbet russia

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 7, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

August 7, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात

August 7, 2026
गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग
Uncategorized

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

August 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 7, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये राष्ट्रीय हातमाग दिन उत्साहात

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर’

August 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon