मुंबई ( वृत्तसंस्था ) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी तर महेश मांजरेकर यांना या चित्रपटाची निर्मिती करुन देणार नाही अशी भूमिका घेतली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंतीच्या मुहूर्तावर अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी गोडसे या चित्रपटाची घोषणा केली आहे. मांजरेकरांच्या या नव्या चित्रपटामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाला राज्यातील वेगवेगळे पक्ष तसेच संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
“चित्रपट निर्माता व अभिनेता महेश मांजरेकर यांनी गांधी जयंती निमित्त नवीन “गोडसे”नावाच्या चित्रपटाची घोषणा केली. त्या चित्रपटाचे टिझर त्यांनी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर रिलीज केले. त्यांनीच घोषणा केलेला सिनेमा हा महेश मांजरेकर यांच्या वैचारिक पातळीचे निदर्शक आहे. महात्मा गांधीच्या जयंतीदिनी त्यांचाच मारेकरी असलेला नथुराम गोडसेच्या आयुष्यावर सिनेमा निर्माण करण्याचा घाट महेश मांजरेकर यांनी घातला आहे, अशी टीका बाबासाहेब पाटील यांनी केलीय.