• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यघटनेमध्ये हस्तक्षेप करण्याचा भाजपचा प्लॅन जनतेने नाकारला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 11, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
राज्यघटनेमध्ये हस्तक्षेप करण्याचा भाजपचा प्लॅन जनतेने नाकारला

जामनेरमध्ये जाहीर सभेत शरद पवार यांचा घणाघात

जामनेर (प्रतिनिधी) :- भाजपचे ४०० खासदार निवडून आणण्याची तयारी होती. कारण यांच्या मनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना बदलण्याचे पाप होते. राज्यघटनेमध्ये हस्तक्षेप करण्याचा डाव पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा होता. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ४८ पैकी ३१ जागा तुम्ही निवडून दिल्यामुळे घटनादुरुस्ती करण्याचे पाप मोदींना करता आले नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. जामनेर येथे ते महाविकास आघाडीचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत बोलत होते.

शरद पवार पुढे म्हणाले की, पाच वर्षांमध्ये माझे केवळ पाच खासदार होते. यावेळेस तुम्ही माझे ९ खासदार निवडून दिले. महाय़ुतीने सत्तेचा उपयोग जनतेसाठी केला नाही, तर सत्तेचा दुरुपयोग केला. टेक्स्टाईल पार्क चार वर्षात झाला नाही. कापसाला भाव मिळाला नाही. सरकार तुमच्या हातात असताना टेक्स्टाईल पार्क करू, अशी घोषणा तुम्ही केली. मात्र तो केला नाही. गेल्या काही वर्षांपूर्वी ७ हजार रुपये भाव द्यावा, म्हणून आंदोलन केले. मात्र, आता किती भाव दिला. कापसाच्या भावासाठी एक शब्द सुद्धा आंदोलन करणारे तुमच्या तालुक्याचे मंत्री आता बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली. महा विकास आघाडीचे सरकार असताना दहा हजार रुपये किमान भाव होता. मात्र, आता भाव खाली पडले आहेत. खानदेशात कापूस पिकत असताना या लोकांनी बाहेर परदेशातून कापूस आणण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना फसवण्याचे काम सरकार मधील येथील नेत्यांनी केला आहे.

जामनेरमध्ये अजून एक सुद्धा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यांच्यासाठी जी जमीन घेतली होती. त्याची किंमत सुद्धा मिळालेली नाही. आणि आता सांगताहेत की, पुढचे पाच वर्ष आमच्या हातात सत्ता द्या. त्यांना लोक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. लोकसभेत आम्ही निलेश लंके याला संधी दिली. त्याच्या घरी मी गेलो, तर दहा बाय दहाचं घर होते. लंके हा साधा माणूस आहे. त्याला लोकांनी डोक्यावर घेतले.आज देशाच्या लोकसभेत तो गेला आणि आमच्या शेजारी बसत आहे. असे पवार यांनी सांगितले. यावेळी सभेत श्रीराम दयाराम पाटील, एजाज मलिक, माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, राजू बोहरा, प्रमोद पाटील, डिगंबर पाटील, मनोहर पाटील, किशोर पाटील, ऍड. ज्ञानेश्वर भोसले, राजश्री पोतदार, शंकर राजपूत, प्रवीण गरुड, अंबरीश गरुड, रुपेश पाटील, सचिन बोरसे, गोपाल दर्जी उपस्थित होते.


 

 

Tags: #jamner dilip khodpe news #maharashtra
Previous Post

विकास कार्याच्या बळावर माझा विजय नक्कीच : अमोल चिमणराव पाटील

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पाचोर्‍यात दुपारी जाहीर सभा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पाचोर्‍यात दुपारी जाहीर सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पाचोर्‍यात दुपारी जाहीर सभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

September 27, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon