मातोश्री फाउंडेशन, शिवाजीनगर येथे उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : मातोश्री फाऊडेशंनतर्फे आ.राजुमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण करण्यात आले. भाजपा महानगर उपअध्यक्ष विजय वानखेडे यांच्या मातोश्री फाऊडेशंनतर्फे बळीरामदादा सोनवणे व्यायाम शाळेत रंजनाताई वानखेडे, डाॅ. विरण खडके, प्रदिप रोटे, संतोष इंगळे, बाळा सोनवणे,यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.
या वेळी अनिल चौधरी, विजय दिक्षीत, एकनाथ खंबायत, हर्षल इंगळे, पियुष वानखेडे परिसरातील नागरिक व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थीत होते. दुसरीकडे भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर परिसर मंडळ क्रमांक १ तर्फे आ. भोळे यांच्या वाढदिवशी शिवाजी नगर परिसरात वृक्षारोपण झाले. याप्रसंगी महानगराचे उपाध्यक्ष राजू मराठे, महानगराचे सरचिटणीस राहुल वाघ, संजू शिंदे, मंडळ अध्यक्ष युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिनेश पुरोहित, मंडळ अध्यक्ष महिला मंडळ अध्यक्ष यामिनी सोनवणे, हकीम संजू सोनवणे, आनंद सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते महेश चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर जोगी, प्रल्हाद सोनवणे, प्रियंका वाघ व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.