• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

प्रियकराच्या मदतीने पतीची सुपारी देऊन हत्या : पत्नीसह पाच जणांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 6, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
चिमुकलीचे तोंड दाबून हत्या ; मेहुणबारे पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर येथील घटना, संशयित आरोपी जामनेर तालुक्यातील

जामनेर (प्रतिनिधी) : अनैतिक संबंधात पती कायम अडसर ठरू लागल्याने पत्नीने प्रियकर व त्याच्या तीन साथीदाराची मदत घेत पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शहरात घडली होती. पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघड झाल्यानंतर जामनेर तालुक्यातील पहूरमधील तिघांसह छत्रपती संभाजी नगरातील प्रियकर व प्रेयसी असलेली संशयित आरोपी पत्नीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पहुर पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक सचिन सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी पहुर येथून अटक केली आहे. अटकेतील चौघांना छत्रपती संभाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीने चौघा साथीदारांच्या मदतीने सुपारी देऊन हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

गणेश जगन्नाथ दराखे (वय ३४,रा.छत्रपती संभाजीनगर) असे मयताचे नाव आहे. रुपाली गणेश दराखे (रा.संभाजीनगर) या विवाहितेचे सुपडू सोनू गायकवाड (३५, कुर्‍हाड, ता.पाचोरा) या तरुणाशी सूत जमले होते. मात्र अनैतिक संबंधात पती गणेश दराखे अडसर ठरू लागल्याने पत्नीनेच पतीचा काढा काढण्याचे ठरवले. ही बाब प्रियकराजवळ बोलून दाखवली. त्यातच गणेश दराखेने आपले घर २१ लाख रुपयात विक्री केल्यानंतर रक्कम आल्यानंतर पत्नीने प्रियकरासोबत दोन लाखात पतीला मारण्याची पहूरच्या अमोल चौधरीला सुपारीही दिली. ४ मे रोजी बांधकाम मिस्तरी असलेला गणेश दराखे हा कामावर निघाल्यानंतर रस्त्यात आरोपींनी गाठत त्याची गळा चिरून हत्या केली.

संभाजीनगर पोलिसांना खुनाबाबत संशय आल्यानतंर त्यांनी पत्नी रुपाली दराखेला ताब्यात घेतल्यानंतर बोलते करताच तिने अनैतिक संबंधाची कबुली दिली. छत्रपती संभाजीनगरातील गणेश दराखे या तरुणाचा खून केल्याप्रकरणी पहूर येथील अमोल चिंतामण चौधरी (३३), अजय दिलीप हिवाळे २५), अनिकेत कडूबा चौथे (२४, सर्व राहणार पहूर कसबे, ता.जामनेर जि.जळगाव) यांना यांना अटक करण्यात आली. तिघांविरोधात संभाजीनगरच्या सिडको पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संभाजीनगरचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, हवालदार संजय नंद, विजय निकम, विजय भाणुसे, मनोहर गीते, चालक संतोष चौरे आदींनी पहूरचे निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकातील अंमलदार गोपाल गायकवाड, ज्ञानेश्वर ठाकरे, विलास चव्हाण यांच्या मदतीने पहूर येथील तिघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, अनिकेत चौथे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.


 

Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/priyakar-madat-patichi-hatya/
Previous Post

सीआयएससीई बोर्डच्या दहावीच्या परीक्षेत अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

Next Post

रेल्वेच्या धक्क्याने अल्पवयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेच्या धक्क्याने अल्पवयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

रेल्वेच्या धक्क्याने अल्पवयीन तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon